पुण्यातील शिवराज विद्यालयात साकारली 75 अंकाची कलाकृती

विश्रांतवाडी, दि. 6 (प्रतिनिधी) – भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून शिवराज विद्यालयातील विद्यार्थ्यांनी 75 अंकाची मानवी साखळीतून कलाकृती तयार केली. शाळेतील 75 गरजू विद्यार्थ्यांना छत्री वाटप, 75 गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप, 175 वृक्षप्रेमी पालकांना वृक्ष वाटप, हर घर झेंडा अभियानाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी परिसरात प्रभात फेरी काढण्यात आली.
यावेळी चित्रकला, वक्तृत्व, निबंध, रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. 75 गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वाटण्यात आली. दि. 13 ते 15 ऑगस्टला”हर घर झेंडा’ हा उपक्रम राबविण्यासाठी पालकांना संस्थेच्या सचिव गीता साळुंखे यांनी आवाहन केले. यावेळी उपाध्यक्ष रवींद्र साळुंखे, मुख्याध्यापक सी. जी. वाघमारे, मुख्याध्यापिका वंदना पठारे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी विनायक काकडे, पोपट कौठाळे, माऊली भुजबळ, संजय मोरे, शिवाजी पवार, गजेंद्र केदार, सिंधू बोरुडे, अर्चना ठाकर, आसरा धामोरे, अश्विनी दरेकर यांनी प्रयत्न केले.





