95 किलो सोने, 70 लाख नोटांचा ढीग, 3 कोटींची 11 घड्याळं अन्…; बंद खोलीत सापडलेले घबाड कोणाचं?

गुजरात : दहशतवादविरोधी पथक (ATS) आणि महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) च्या पथकाने गुजरातमधील अहमदाबाद येथील पालडी भागातील आविष्कार अपार्टमेंटमध्ये छापा टाकला. छाप्यादरम्यान अधिकाऱ्यांनी 95.5 किलो सोन्याची बिस्किटे आणि 70 लाख रुपये रोखड जप्त केली. येथे तपास यंत्रणेच्या पथकांनी 17 तास सतत शोधमोहीम राबवली.
अधिकाऱ्यांकडे अनेक बेनामी संपत्तीची कागदपत्रेही सापडली आहेत. तपास यंत्रणांनी छापा टाकलेला आविष्कार अपार्टमेंटचा फ्लॅट मेघ शहा यांचा आहे. तो स्टॉक मार्केट ऑपरेटर आहे. मेघ शहा हा मूळचा वाव थरडच्या जेतर्डा गावचा रहिवासी आहे. तो मुंबईत राहतो. आविष्कार अपार्टमेंटमध्ये त्यांनी फ्लॅट भाड्याने घेतला होता. त्याच इमारतीत त्याची बहीण पम्मी शाहही राहते.
3 कोटींची 11 घड्याळही सापडले
एटीएसच्या अधिकाऱ्यांनी सोसायटीच्या अध्यक्षाकडून फ्लॅटची माहिती मिळवली आहे. अधिकाऱ्यांनी आधी पम्मी शाह यांच्या फ्लॅटवर छापा टाकला. यानंतर मेघ शहा यांच्या फ्लॅटवर छापा टाकण्यात आला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मेघ शहाच्या घरातून 3 कोटींहून अधिक किमतीचे घड्याळही सापडले आहे. डीआरआयची टीम संपूर्ण वस्तूची तपासणी करेल. अहमदाबादमधील फ्लॅटमध्ये सापडलेल्या वस्तूंचे मुंबईशी कनेक्शन आहे.
84 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
मेघ शाहने शेअर बाजारातून कमावलेल्या पैशातून सोने खरेदी केले आणि ते लपवण्यासाठी अहमदाबादमध्ये हा फ्लॅट भाड्याने घेतला होता. या छाप्यात अधिकाऱ्यांनी मेघ शाह यांची 80 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. मेघ शाहच्या वडिलांचे नाव महेंद्र शाह आहे. महेंद्र हा शेअर मार्केटमध्ये ऑपरेटर म्हणून काम करतो. त्याने याआधीही सेबीच्या अधिकाऱ्यांशी जवळीक असल्याच्या अफवा पसरवून फसवणूक केली आहे. महेंद्र वर्षानुवर्षे बंद असलेली कंपनी विकत घेऊन सेबीमध्ये लिस्ट करायचा.
काय म्हणाले अधिकारी?
एटीएसचे सहायक पोलिस आयुक्त एसएल चौधरी यांनी सांगितले की, फ्लॅटमधून सुमारे 95.5 किलो सोने जप्त करण्यात आले आहे. याशिवाय 70 लाखांची रोकडही सापडली आहे. मेघ शहा आणि महेंद्र शहा यांनी तस्करीचे सोने आणि 80 कोटी रुपयांची रोकड फ्लॅटमध्ये लपवून ठेवली होती.
मुंबईमध्येही 6 कोटी 28 रुपयांच्या सोन्याची तस्करी
6 कोटी 28 रुपयांच्या सोन्याची तस्करी केल्याच्या आरोपाखाली दुबईहून मुंबईला प्रवास करणाऱ्या तीन इराणी नागरिकांना अटक करणाऱ्या महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी बुधवारी सिंडिकेटच्या चौथ्या सदस्याला अटक केली. दुबईहून मुंबईला 6.28 कोटी रुपयांच्या सोन्याची तस्करी केल्याच्या आरोपाखाली तीन इराणी नागरिकांना अटक करणाऱ्या महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी बुधवारी सिंडिकेटच्या चौथ्या सदस्याला अटक केली. डीआरआयच्या चौकशीत असे दिसून आले आहे की या सिंडिकेट सदस्यांनी यापूर्वी भारतात 28 कोटी रुपयांच्या किमान 40 किलो सोन्याची तस्करी केली होती.





