Mahesh Nagari Multistate Dividend: ‘महेश मल्टिस्टेट’कडून ९ टक्के लाभांश जाहीर

पुणे : Mahesh Nagari Multistate Co. Op Credit Society – महेश नागरी मल्टिस्टेट को. ऑप क्रेडिट सोसायटीकडून सभासदांना ९ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला आहे. संस्थेची नुकतीच २६वी वार्षिक सर्वसाधारण सभा सुखसागरनगर येथे संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राजेश धनराज राठी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक/ सीईओ मगराज राठी यांनी संस्थेच्या वार्षिक ताळेबंदाविषयी माहिती देताना संस्थेच्या एकूण ठेवी १७३ कोटी ६८ लाख व एकूण कर्जवाटप ९९ कोटी ९६ लाख रुपये झाले आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात १ कोटी ५६ लाख रुपयांचा नफा झाला आहे. तसेच, सदर वर्षात एकूण उलाढाल ही २७० कोटी रुपयांची झाली आहे. मार्च २०२४ पर्यंत संस्थेचा राखीव निधी २२.२४ कोटी रुपये होता, तर भाग भांडवल हे ३.१३ कोटी रुपये असल्याचे नमूद केले.
राठी म्हणाले, महेश नागरी मल्टिस्टेट सुरुवातीपासूनच चांगली कामगिरी करत असून संस्था नियमांचे काटेकोरपणे पालन करत आहे. सातत्यपूर्ण कामगिरीवर आमचा विश्वास असून संस्था त्यादृष्टीने काम करत आहे. सभासदांची सुरक्षितता, योग्य सेवा आणि विश्वासाच्या जोरावर संस्था झेप घेत आहे. रिअल इस्टेटसारख्या किंवा मोठ्या कंपन्यांना संस्था वित्तपुरवठा करत नाही. तसेच, कोणत्याही ग्राहकाला १ कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्जपुरवठा करण्यात येत नाही. स्थानिक आणि मध्यमवर्गीय लोकांच्या गरजा लक्षात घेऊन संस्था कर्जवाटप करते. सभेत संस्थेतर्फे विविध क्षेत्रातील दिवंगताना श्रद्धांजली वाहण्यात आली. सभेस जवळपास ६०० सभासदांची उपस्थिती होती. सभेचे उपाध्यक्ष प्रविण बांगड यांनी आभार व्यक्त करुन सभा संपल्याचे जाहीर केले.
महेश नागरीचे येणाऱ्या काळात विस्तारीकरण आगामी काळात महेश नागरी संस्थेचे विस्तारीकरण होणार असून नवीन दोन शाखा उघडण्यासाठी केंद्रिय सहकार खात्याकडून परवानगी मिळाली आहे. त्यानुसार लवकरच पिंपरी-चिंचवड आणि गुजरातमधील सुरत शहरामध्ये या शाखा उघडण्यात येणार असून संस्थेच्या शाखांचे जाळे विस्तारणार आहे. सध्या संस्थेच्या सहा शाखा असून या दोन शाखांनंतर एकूण आठ शाखा होणार आहेत. संस्थेची नोंदणी ७ सप्टेंबर १९९८ रोजी झाली आणि १ ऑक्टोबर १९९८ रोजी विजया दशमीच्या शुभदिवशी कामकाज सुरू झाले होते.





