पुणे जिल्हा | जुन्नरमध्ये 100 दिवसांत 8842 मिमी पाऊस
Updated On:

जुन्नर, (वार्ताहर) – जुन्नर परिसरासह तालुक्यामध्ये गेल्या 100 दिवसांत 8842 मिमी इतका पाऊस झालेला असून सरसरी पेक्षा जादा पाऊस यावर्षी झालेला आहे. तालुक्याची पावसाची सरसरी 750 मिमी इतकी असताना यावर्षी गेल्या 100 दिवसांत 795 मिमी इतका पाऊस झालेला आहे.
तालुक्याच्या आदिवासी मावळ भागात पावसाचे प्रमाण अधिक असून त्यामानाने मध्यपूर्व भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. तालुक्यात मागील वर्षी पेक्षा यावर्षी समाधानकारक पाऊस होत आहे.
तालुक्यातील 9 पर्जन्यमापक केंद्रांवर गेल्या 100 दिवसांत झालेला तर याच कालावधीत मागील वर्षी झालेल्या पावसाच्या नोंदी मिमीमध्ये जुन्नर : 659 / 401 , नारायणगाव : 489 / 220 , ओतूर : 400 / 248 , वडगाव आनंद : 267 / 132 , बेल्हे : 386 / 179 , निमगाव सावा : 407 / 170 , मढ : 1735 / 632 , आपटाळे : 1305/ 861 , आजनावळे : 3194 / 1858.





