पुणे | जिल्ह्यात 8,417 मतदान केंद्र निश्चित

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदान केंद्रांची संख़्या सुमारे 300 ने वाढविण्यात आली आहे.
जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघात एकूण 8 हजार 417 मतदान केंद्र असणार आहे. मतदान केंद्रांची संख्या वाढविण्यात आल्याने मतदारांना मतदान करणे सोयीचे होणार आहे.
ग्रामीण भागातील जुन्नर विधानसभा मतदासंघात ३५६ मतदान केंद्रे असणार आहेत, आंबेगाव मतदार संघात ३४१ मतदान केंद्र, खेड आळंदी मतदार संघात ३८९ मतदान केंद्र, शिरूर मतदार संघात ४५७ मतदार केंद्र, दौंड मतदार संघात ३१० मतदान केंद्र,
इंदापूर मतदार संघात ३३७ मतदान केंद्र , बारामती मतदार संघात ३८६ मतदान केंद्रे, पुरंदर मतदार संघात ४१३ मतदान केंद्रे, भोर-वेल्हा-मुळशी मतदार संघात ५६४ मतदान केंद्र आणि मावळ मतदार संघात ४०२ मतदान केंद्र असणार आहेत.
तर, पिंपरी-चिंचवड शहरात तीन विधानसभा मतदारसंघ येतात. चिंचवड मतदार संघात ५६१ मतदान केंद्र, पिंपरी मतदार संघात ३९८ मतदान केंद्रे,भोसरी मतदार संघात ४८३ मतदान केंद्रे आहेत.
पुणे शहरातील मतदान केंद्र संख्या
पुणे शहरातील वडगांव शेरी मतदार संघात ४३७, शिवाजीनगर-२८०, कोथरूड-३८७, खडकवासला-५०५, पर्वती-३४४, हडपसर-५२५, पुणे कॅन्टोन्मेंट-२७४ आणि कसबा पेठ मतदार संघात २६८ मतदान केंद्रांची संख्या निश्चित करण्यात आली आहेत.




