Nagar | मुळा धरणात 8205 दशलक्ष घनफूट पाणीसाठा

राहुरी, (प्रतिनिधी)- 26 हजार दशलक्ष घनफूट क्षमतेच्या मुळा धरणात आज सायंकाळी सहा वाजता 8205 दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत तो 2121दशलक्ष घनफूटने कमी आहे.एक जुलैपासून धरणात 2176 दशलक्ष घनफूट पाणी नव्याने आले असल्याची माहिती मुळा पाटबंधारे कार्यकारी अभियंता सायली पाटील, शाखा अभियंता राजेंद्र पारखे यांनी दिली.
गेल्या पाच वर्षात 2019 ला सर्वाधिक कमी 7680 दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता . धरणात आज सकाळी कोतुळला 2829 क्यूसेक्स पाण्याची आवक होती .सायंकाळी सहा वाजता मात्र ही पाण्याची आवक कमी झाली. सायंकाळी सहा वाजता 1873 क्युसेक्स एवढी पाण्याची आवक होती.
मुळा धरणाच्या पाणलोटक्षेत्रातील पावसाकडे लाभधारक शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. शेती सिंचन, पिण्याचा पाणीपुरवठा व औद्योगिक पाणीपुरवठा या सर्व दृष्टीने मुळाधरणातील पाणीसाठा महत्त्वाचा आहे. सध्या तरी पाणलोट क्षेत्रात पावसाचा विशेष जोर नाही. रिमझिम पाऊस आहे. दरम्यान धरणाच्या लाभक्षेत्रात पुनर्वसु नक्षत्राच्या पावसाने सर्वदूर कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली आहे. तालुक्यात अधूनमधून दिवसभर पावसाची हजेरी होती.
15 जुलै रोजी पाच वर्षातील पाणीसाठा दशलक्ष घनफूटमध्ये
2023 -10326
2022 – 13053
2021 – 9405
2020 – 8906
2019 – 7680




