Raigad News : 80 वर्षींय व्यक्तीकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; रायगडमधील संतापजनक घटना

रायगड : रायगड येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. 80 वर्षींय व्यक्तीने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला असून त्यांच्याविरोधात माणगावच्या गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यातील एका 80 वर्षीय व्यक्तीचे किराणा दुकान आहे. त्याच्या दुकानात चॉकलेट घेण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीला तुला चॉकलेट देतो असे म्हणत हमजा नामक व्यक्तीने दुकानात बोलवले. ती दुकानात आली असता मुलीचा विनयभंग करून तिच्या मनात लज्जास्पद भावना निर्माण होईल असे कृत्य केले.
या प्रकारानंतर मुलीने रडत रडत घरी जात पालकांना याबाबत माहिती दिली. चिमुकलीने आपबिती सांगितल्यानंतर संतप्त झालेल्या वडिलांनी गोरेगाव पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी केलेल्या मेडिकल रिपोर्टनुसार संबंधित मुलीवर अत्याचार झाल्याचे उघड झाले आहे. यानंतर आरोपीवर बाल लैंगिक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनी आरोपी हमजाला अटक केली आहे.
जतमध्ये मुलीवर बापाचा अत्याचार
जत पूर्व भागातील एका गावात आपल्या पोटच्या 13 वर्षांच्या अल्पवयीन लेकीवर बापानेच अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. नराधम बापावर रात्री उशिरा उमदी पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.





