तलवाडा घाटात ट्रक उलटून 80 मेंढ्यांचा जागीच मृत्यू; चालक किरकोळ जखमी
Updated On:

शिऊर – मालेगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वैजापूर तालुक्यातील तलवाडा घाटात मेंढ्या घेऊन जाणारा ट्रक उलटल्याने मोठा अपघात झाल्याची घटना घडली. यामध्ये ८० ते ९० मेंढ्या जागीच ठार झाल्याचे वृत्त आहे. वळण लक्षात न आल्याने ट्रक पलटी झाल्याचा अंदाज आहे.
मृग नक्षत्र बरसल्याने राजस्थानातूनन भरून आलेल्या मेंढ्यांचा ट्रक (आरजे २९ जीई १२५९) चालक चत्तरसिंग रावत (रा. राजस्थान), वाहक इरफान कुरेशी हे ट्रकमध्ये २४० मेंढ्या हैदराबाद येथे घेऊन जात असताना वाहनचालकाचा अंदाज चुकल्याने ट्रक पलटी होऊन अपघात घडला.
घटनेत चालक किरकोळ जखमी झाला असून मेंढी मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून गाडीचेही नुकसान झाले आहे.





