लग्नाला 8 वर्ष पूर्ण; मृण्मयी देशपांडेने पतीसाठी खास अंदाजात शेअर केली पोस्ट

Mrunmayee Deshpande | मराठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. अनेक व्हिडिओ आणि फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. नुकतेच तिच्या लग्नाला आठ वर्ष पूर्ण झाले आहेत. या निमित्त तिने इनस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. मृण्मयीने ३ डिसेंबर २०१६ मध्ये स्वप्नील रावशी लग्नगाठ बांधली. या दोघांचं लग्न अरेंज मॅरेज पद्धतीत झाले आहे. आता तिने नवऱ्याला खास अंदाजात लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मृण्मयीने पोस्ट करत लिहिले की, “८ वर्ष… स्वप्नील, गेली ९ वर्षे आपण एकमेकांना ओळखतो. त्यात सहजीवनाची ही ८ वर्षे पूर्ण झाली. या संपूर्ण काळात आपल्या नात्यात कधीच कंटाळवाणा क्षण आला नाही. ही सगळी वर्षे अत्यंत सुंदर होती. माझं तुझ्यावर खूप प्रेम आणि त्यापेक्षाही मला तुझा प्रचंड अभिमान आहे. आपण निवडलेला मार्ग निश्चितच सोपा नाही. पण, हे क्षण मी तुझ्याशिवाय अन्य कोणाबरोबरही अनुभवू शकत नाही. आयुष्यात असेच सुंदर क्षण एकत्र घालवूयात, आय लव्ह यू.” मृण्मयीच्या या पोस्टवर चाहत्यांसह कलाकारांनी त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. Mrunmayee Deshpande |
View this post on Instagram
दरम्यान, मृण्मयी सध्या पतीसोबत महाबळेश्वरमध्ये राहते. याच ठिकाणी दोघांनी ‘नील अँड मोमो’ नावाचा व्यवसाय सुरू केला आहे. दोघेही शेतात एकत्र काम करून नैसर्गिक उत्पादन निर्मितीवर भर देतात. येथील अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. Mrunmayee Deshpande |
मृण्मयीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ती ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटात झळकली होती. यात तिने सुधीर फडके यांच्या पत्नी ललिताबाई फडके यांची भूमिका साकारली आहे. यातील तिच्या भूमिकेचे देखील अनेकांकडून कौतुक करण्यात आले. याशिवाय ती सूत्रसंचालन देखील उत्तमरित्या करते.
हेही वाचा:





