प्रजासत्ताक दिनाची परेड कधी आणि कुठे पाहता येईल? जाणून घ्या

Republic Day Parade 2025 : आज भारत 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्लीत देखील कर्तव्य पथावर मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावर्षी प्रजासत्ताक दिनाला इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबिआंतो हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. याशिवाय, देशभरातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनेक मान्यवरांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्य पथावर खास परेडचे आयोजन करण्यात आले आहे. या परेडच्या माध्यमातून भारताकडून स्वतःच्या लष्करी ताकदीचे व सांस्कृतिक विविधतेचा प्रदर्शन केले जाते. तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या परेड पाहण्याचा आनंद घरबसल्या देखील घेऊ शकता.
प्रजासत्ताक दिन परेडची वेळ
नवी दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाची मुख्य परेड सकाळी 10:30 वाजता विजय चौकातून सुरू होईल, नंतर कर्तव्य पथावरून पुढे जात इंडिया गेट पार करेल आणि लाल किल्ल्यावर परेडचा समारोप होईल. ४७ विमानांच्या हवाई प्रात्यक्षिकेने कार्यक्रमाचा समारोप होईल.
प्रजासत्ताक दिन परेड घरबसल्या कुठे पाहू शकता?
प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम तुम्ही घरबसल्या टीव्हीवर पाहू शकता. डीडी नॅशनलच्या माध्यमातून परेड पाहू शकता. सकाळी 9:00 वाजता भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण होईल. त्यानंतर परेडला सुरुवात होईल. तुम्ही डीडी नॅशनलच्या युट्यूब चॅनेलवरून देखील प्रजासत्ताक दिन परेड पाहण्याचा आनंद घेऊ शकता.
यंदाच्या प्रजासत्ताक दिनाची थीम ‘सुवर्ण भारत: वारसा आणि विकास’ ही आहे. भारतीय राज्यघटना लागू होऊन 75वर्ष पूर्ण झाल्याने यावर्षीचा प्रजासत्ताक दिन विशेष आहे. या परेडमध्ये 16 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश तसेच 10 मंत्रालये आणि विभागांचे चित्ररथ असतील. यावेळी महाराष्ट्राचा ‘मधाचे गाव’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ असणार आहे.





