नायजेरियामध्ये बोट दुर्घटनेत 76 जणांना जलसमाधी
Updated On:

अबुजा, (नायजेरिया) – नायजेरियात ( Nigeria ) एका बोटीच्या दुर्घटनेत किमान 76 जणांचा मृत्यू झाला आहे. नायजेरियातील ( Nigeria ) अनांब्रा प्रांतात ही दुर्घटना घडली. ओगबारू भागात आलेल्या पूराच्या पाण्यातून प्रवास करणाऱ्या बोटीतून 85 जण प्रवास करत होते. बोट बुडाल्याचे वृत्त समजल्यानंतर मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले.
मात्र बोटीतील कोणी जिवंत सापडू शकले नाही. आतापर्यंत 76 जणांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. उर्वरित प्रवाशांचा सोध सुरू आहे. नायजेरियाचे अध्यक्ष मोहम्मदू बुहारी यांनी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींप्रती दुःख व्यक्त केले आहे.





