नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर 72 तासांची प्रचारंबदी
Updated On:

नवी दिल्ली – जातीयवादी वक्तव्य केल्याच्या आरोपावरून निवडणूक आयोगाने सोमवारी कॉंग्रेस नेते आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर 72 तासांची प्रचारबंदी घातली. ती बंदी उद्या (मंगळवार) सकाळी 10 वाजल्यापासून लागू होणार आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि कॉंग्रेसचे उमेदवार तारिक अन्वर यांच्या प्रचारासाठी सिद्धू यांची 16 एप्रिलला बिहारमध्ये सभा झाली. कटिहारमधील त्या सभेत बोलताना सिद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्यासाठी एकगठ्ठा मतदान करण्याचे आवाहन मुस्लिम मतदारांना केले होते. त्यावरून वादंग निर्माण झाले. सिद्धू यांच्या त्या वक्तव्याची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाईचे पाऊल उचलले आहे. अशीच प्रचारबंदी याआधी इतर काही महत्वाच्या नेत्यांनाही करण्यात आली.





