70th National Film Awards: राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांना बक्षीस आणि मानधन किती मिळतं? वाचा…
70th National Film Awards – 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हे सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार आहेत, जे जिंकण्याचे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. हे पुरस्कार दरवर्षी जाहीर केले जातात. यावर्षीचे पुरस्कार वर्ष 2022 साठी देण्यात आले आहेत. त्याचबरोबर गुलमोहरला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. तर मल्याळम चित्रपट अट्टमला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपटाचा पुरस्कार केजीएफ चॅप्टर 2 ला जाहीर करण्यात आला आहे.
मल्याळम चित्रपट अट्टमला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे, तर सूरज आर बडजात्याला उत्था या हिंदी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. नित्या मेननला तमिळ चित्रपट तिरुचितारामबलमसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा तर मानसी पारेखला गुजराती चित्रपट कच्छ एक्सप्रेससाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. कन्नड चित्रपट कांतारा अभिनेता ऋषभ शेट्टी याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.
नीना गुप्ता यांना इच्छा या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे तर पवन मल्होत्रा यांना फौजा या हरियाणवी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. शर्मिला टागोर आणि मनोज बाजपेयी यांच्या गुलमोहर या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला आहे.
मणिरत्नम यांच्या पोन्नियन सेल्वन 1 चित्रपटाचे पार्श्वसंगीत ए.आर. रहमान यांना हा पुरस्कार मिळाला आहे. पोन्नियन सेल्वन 1 ला सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपटाचा पुरस्कारही मिळाला. प्रीतमला ब्रह्मास्त्र भाग 1 साठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक (गाणे) पुरस्कार देखील मिळाला आहे. चित्रपट ज्युरीचे अध्यक्ष राहुल रवैल यांनी चित्रपट पुरस्कारांची घोषणा केली.
सर्वोत्कृष्ठ मराठी चित्रपटाचा पुरस्कार
‘वाळवी’ चित्रपटाला सर्वोत्तम कला सांस्कृतिक चित्रपट पुरस्कार जाहीर. प्रत्येकी 2 लाख रुपये आणि रजत कमळ मिळेल.
विशाल भारद्वाज सर्वोत्तम ठरला
फुरसात या लघुपटासाठी विशाल भारद्वाज यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे.
गुलमोहरला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार
मनोज बाजपेयींच्या गुलमोहरला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. मल्याळम चित्रपट अट्टमला सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट कांतारा आणि सर्वोत्कृष्ट फीचर चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराचं स्वरुप रजत कमळ आणि दोन लाख रुपये असं असेल.
हा सर्वोत्तम दिग्दर्शक
सूरज बडजात्या यांना ‘उचाई’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे.
नीना गुप्ता यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार
नीना गुप्ता यांना इच्छा या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. पवन मल्होत्राला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार
यावर्षी बॉलिवूडमधील एकाही अभिनेत्रीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला नाही. नित्या मेनन (थिरुचित्रंभलम) आणि मानसी पारेख (कच्छ एक्सप्रेस) यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. यासाठी दोघींमध्ये रजत कमळ आणि दोन लाख रुपये बक्षिसाची रक्कम विभाजित होईल.
सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार
ऋषभ शेट्टीच्या कंतारा या चित्रपटाने बाजी मारली आहे. ऋषभला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे, तर या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक पुरस्कार
ब्रह्मास्त्रसाठी अरिजित सिंगला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार मिळाला आहे.
सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपटाचा पुरस्कार
यशच्या KGF 2 या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.
सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट पुरस्कार
मणिरत्नम दिग्दर्शित पोन्नियिन सेल्वन 1 ने सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपटाचा पुरस्कार पटकावला आहे. या चित्रपटात ऐश्वर्या राय, शोभिता धुलिपाला यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
मनोज बाजपेयी यांनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
विशेष उल्लेखनिय, गुलमोहर या चित्रपटासाठी मनोज बाजपेयी यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म, पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक या विभागातील विजेत्यांना स्वर्णकमळ आणि प्रत्येकी 3 लाख रुपये बक्षीस दिलं जाईल.





