परदेशांमधील तुरूंगांत ‘एवढे’ भारतीय आहेत कैदेत; सौदी अरेबियात सर्वाधिक
Updated On:

नवी दिल्ली – परदेशांमधील तुरूंगांत 7 हजार 139 भारतीय कैदेत आहेत. सौदी अरेबियात सर्वांधिक 1 हजार 599 भारतीय तुरूंगवास भोगत आहेत, अशी माहिती परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.मुरलीधरन यांनी गुरूवारी राज्यसभेत दिली.
सौदीखालोखाल संयुक्त अरब अमिरातीत (यूएई) 898, तर नेपाळमध्ये 886 भारतीय कैदेत आहेत. मलेशियातील तुरूंगांमध्ये 548, तर कुवेतच्या तुरूंगांमध्ये 536 भारतीय आहेत. संबंधित आकडेवारी सरलेल्या वर्षाच्या अखेरपर्यंतची आहे.
अनेक देशांमध्ये गोपनीयतेशी निगडीत कडक कायदे आहेत. त्यामुळे ते देश कैद्यांशी संबंधित माहिती सहजपणे उघड करत नाहीत. जे देश माहिती देतात; ती तपशीलवार नसते, असेही मुरलीधरन यांनी स्पष्ट केले.





