Rajasthan : राजस्थानमध्ये एकाच वेळी ७ महिला आयएएस; कोणाला मिळाली कोणती जबाबदारी? पाहा…

Rajasthan – राजस्थान सरकारने सोमवारी विविध जिल्ह्यांमध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी (एसीएम) पदावर १३ भारतीय प्रशासकीय सेवेतील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश जारी केले. यामध्ये कोटासाठी आराधना चौहान, उदयपूरसाठी सृष्टी दाबास, श्रीगंगानगरसाठी अदिती यादव, भीलवाड्यासाठी मेधा आनंद, अजमेरसाठी नेहा राजपूत उद्धव सिंग, बिकानेरसाठी स्वाती शर्मा आणि अलवरसाठी ऐश्वर्या प्रजापती यांना जबाबदारी देण्यात आली आहे.
राजस्थान केडरमध्ये सामील झालेल्या ७ महिला आयएएस अधिकाऱ्यांव्यतिरिक्त, ६ पुरुषांचाही समावेश आहे. ज्यामध्ये मोहन लाल यांची जोधपूरमध्ये, रवींद्र कुमार मेघवाल यांची चित्तोडगडमध्ये आणि बिरजू गोपाल चौधरी यांची पालीमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मृणाल कुमार यांना जयपूर, रोहित वर्मा यांना जैसलमेर आणि भानू शर्मा यांना भरतपूर येथे तैनात करण्यात आले आहे.
आराधना चौहान – (कोटा एसीएम) – आराधना चौहान या मध्य प्रदेशातील इंदूरच्या रहिवासी आहेत. त्या २०२४ च्या बॅचच्या आयएएस आहेत. चौथ्या प्रयत्नात त्यांनी युपीएससीमध्ये यश मिळवले. त्याचा क्रमांक २५१ वा होता. आराधना यांनी २०१५ मध्ये भोपाळ येथून बी.टेक केले.
सृष्टी दाबस – (उदयपूर एसीएम) – सृष्टी दबास या राजधानी दिल्लीच्या रहिवासी आहेत. सृष्टी दाबस या २०२४ च्या बॅचच्या आयएएस आहेत. त्यांना देशात सहावा क्रमांक मिळाला. आयएएसमध्ये येण्यापूर्वी, त्या मुंबईतील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या एचआर शाखेत काम करत होत्या.
अदिती यादव – (श्रीगंगानगर एसीएम) – अदिती यादव या राजस्थानमधील बेहरोर येथील रहिवासी आहेत. आदिती यांनी पहिल्याच प्रयत्नात आयएएसची पदवी मिळवली. २०२४ च्या यूपीएससी परीक्षेत आदितीने १९४ वा क्रमांक मिळवला होता.
मेघा आनंद – (भिलवाडा एसीएम) – यूपीएससी परीक्षेत अखिल भारतीय १३ वा क्रमांक मिळवणारी मेघा आनंद या उत्तर प्रदेशातील बरेलीच्या रहिवासी आहेत. २०१९ मध्ये मेधा यांना ३११ वा क्रमांक मिळाला. या आधारावर, मेधा आनंद यांना भारतीय रेल्वे वाहतूक सेवेत नियुक्ती मिळाली. मेधा आनंद यांची सहाय्यक जिल्हाधिकारी, भिलवाडा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
नेहा राजपूत उद्धव सिंग – (अजमेर एसीएम) – महाराष्ट्रातील नेहा राजपूतने पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यांना संपूर्ण भारतात ५१ वा क्रमांक मिळाला. आयएएस होण्यापूर्वी नेहा डॉक्टर होत्या.
स्वाती शर्मा – (बिकानेर एसीएम) – झारखंडमधील सतना येथील रहिवासी असलेल्या स्वाती शर्मा यांनी तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससी नागरी सेवा परीक्षेत १५ वा क्रमांक मिळवला. स्वाती यांना बीकानेरमध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली आहे.
ऐश्वर्या प्रजापती – (अलवर एसीएम) – २०२४ च्या बॅचच्या आयएएस ऐश्वर्या प्रजापती यांनी देशभर १० वा क्रमांक मिळवला. हा ऐश्वर्या यांचा दुसरा प्रयत्न होता. याआधी ऐश्वर्याने उत्तराखंडमधून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये अभियांत्रिकीची पदवी संपादन केली होती. त्या विशाखापट्टणम येथील एलएनटी कंपनीत काम करत होत्या.





