nagar | कोयत्याने हल्ला करणारे ७ जण ताब्यात

नगर, (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणूक काळात शहरातील मतदान केंद्राजवळ कोयत्याने मारहाण करणारे सात जण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. तसेच एक अल्पवयीन मुलाचा समावेश असून त्यांना तोफखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
अभिषेक उर्फ सोन्या राजेंद्र लांडगे, संकेत किसनराव भिंगारदिवे, जमीर शौकत पठाण, ओमकार सतिष आपरे,(सर्व रा. गांधीनगर, नगर), परमेश्वर हरिभाऊ मगर( रा. बोल्हेगांव), थॉमस उर्फ योगेश संतोष सरोदे, यश रावसाहेब शिरसाठ (नगर), व एक विधीसंघर्षीत बालक यांना नगर शहरातून विविध भागातून ताब्यात घेतले आहे.
ही घटना गंभीर स्वरुपाची असल्याने व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दोन्ही गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन त्यांना अटक करणेबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना कारवाई करण्याबाबत सूचना केल्या.
त्यानुसार दोन्ही पथकांनी जिल्हा रुग्णालय व मॅककेअर हॉस्पीटल येथे ऍ़डमिट असलेल्या फिर्यादींना भेटुन, गुन्ह्याची संपुर्ण माहिती घेण्यात आली. त्यानंतर गुप्त बातमीदारामार्फत अनोळखी आरोपींचे पूर्ण नांव पत्ते निष्पन्न केले. या दोन्ही गुन्ह्यातील आरोपी हे गुन्हा घडल्यानंतर लागलीच फोन बंद करुन पळुन गेले होते. त्यांचा शोध घेऊन नगर शहरातील विविध भागातून ताब्यात घेतले.





