Pakistan operation : पाकिस्तानच्या कारवाईत ६७ अफगाण तालिबानी ठार
Pakistan operation : पाकिस्तानी सैन्याने काल रात्रभरात केलेल्या कारवाईमध्ये आणखी ६७ अफगाण तालिबानींचा खात्मा केला आहे.

Pakistan operation – पाकिस्तानी सैन्याने काल रात्रभरात केलेल्या कारवाईमध्ये आणखी ६७ अफगाण तालिबानींचा खात्मा केला आहे. देशाच्या नैऋत्येकडील सीमेजवळच्या १६ ठिकाणांवर आज सकाळी अफगाण तालिबान्यांनी केलेले हल्ले पाक सैन्याने परतवून लावले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पाकिस्तानने अफगाण तालिबानविरोधात सुरू केलेल्या ऑपरेशन गझब लिल हक मधील ताजी माहिती पाकचे माहिती मंत्री अताउल्लाह तरार यांनी दिली. दिनांक २६ फेब्रुवारी रोजी अफगाण तालिबानने घातलेल्या छाप्यांना उत्तर म्हणून ही कारवाई सुरू करण्यात आली होती. Pakistan operation
रात्रभरात खैबर पख्तुनख्वा प्रांतात केलेल्या कारवाईमध्ये किमान ४० अफगाण तालिबानी ठार झाले. यातील एका ठिकाणी प्रत्यक्ष हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला होता. तर १२ ठिकाणांवर लांबून मारा करण्यात आला होता. हे सर्व हल्ले निष्फळ ठरवण्यात आले होते, असे तरार यांनी सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
दुसरीकडे अफगाण तालिबानने नॉर्दर्न बलुचिस्तानमधील किल्ला सैफुल्लाह, नोश्की आणि चमन जिल्ह्यात सीमेपलिकडून १६ ठिकाणी प्रत्यक्ष हल्ला देखील केला. पाकिस्तानी सैन्याला २५ ठिकाणी या हल्ल्यांना उत्तर द्यावे लागले.
हे हल्ले परतवून लावले गेले असून अफगाण तालिबानचे २४ सैनिक मारले गेले आणि कितीतरी जण जखमी झाले. या संघर्,दरम्यान पाकिस्तानच्या पॅरामिलिटरी फ्रॉन्टिअर कॉर्प्स बलुचिस्तानचा एक सैनिक ठार झाला. तर अन्य ५ सैनिक जखमी झाले आहेत, असेही तरार यांनी सांगितले.
पाकिस्तानी सुरक्षा दलांनी ४३५ अफगाण तालिबानींना ठार केले आणि अन्य ६३० जखमी झाले असे तरार सोमवारी म्हणाले होते. अफगाणींचे १८८ रणगाडे, चिलखती वाहने नष्ट केली गेली आणि ३१ चौक्यांवर ताबा मिळवल्याचेही ते म्हणाले होते.
दरम्यान पाक सैन्याने अफगाणिस्तानच्या नानगरहार प्रांतात हवाई हल्ला करून दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केल्याचा दावा सरकारी वृत्तवाहिनीने केला आहे. टीटीपीविरोधातल गझब उल-लिल-हक ही कारवाई अएजूनही सुरू असून आपले उद्दिष्ट साध्य होईपर्यंत ही कारवाई सुरूच राहणार असल्याचेही वृत्तवाहिनीने म्हटले आहे.






