मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे सध्या नाशिक-नगर दौऱ्यावर आहेत. पक्ष, संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने अमित ठाकरे यांचा हा दौरा महत्वाचा आहे. अमित ठाकरे यांच्या या दौऱ्यादरम्यान सिन्नर तालुक्यातील समृद्धी महामार्गावरील टोलनाक्यावर मोठा राडा झाला आहे. सध्या या घटनेचा एक व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.
टोल नाक्यावर अमित ठाकरे यांचा अपमान झाल्याचा मनसे कार्यकर्त्यांचा आरोप आहे. खवळलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी थेट टोल नाकाच फोडला. सिन्नर टोल नाक्यावर अमित ठाकरे यांना अर्धातास तिष्ठत ठेवल्याचा आरोप होतोय. दरम्यान, आता यासर्व घटनेवर स्वतः अमित ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. “साहेबांमुळे 65 टोलनाके बंद झाले, माझ्यामुळे आज अजून एक अॅड झाला….’ असं अमित ठाकरे म्हणाले आहेत.
काय म्हणाले अमित ठाकरे !
अमित ठाकरे म्हणाले… “रात्री साईबाबांचा दर्शन घेतल्यानंतर मला नाशिकला काम असल्याने मी नाशिककडे निघालो. सिक्युरिटी दिवसभर बरोबर असल्याने त्यांना शिर्डीचा थांबायला सांगितलं. कोपरगावहून समृद्धी महामार्गावरुन नाशिककडे निघालो आणि सिन्नरजवळ असलेल्या एक्झिटला माझी गाडी थांबवली. गाडीला फास्टॅग असतानाही तो रॉड खाली आला.
तो टोलनाक्याचा काहीतरी टेक्निकली प्रॉब्लेम होता. माझ्या सहकाऱ्याने ने त्यांना फास्टॅगबाबत विचारलं तर त्यांनी आमचे काही इश्यूज आहेत असं आम्हाला सांगितलं. टोलनाक्यावरील कर्मचारी सुद्धा अत्यंत उद्धट होते. तर मॅनेजरला त्यांनी फोन केला तेव्हा तो सुद्धा तशाच भाषेत बोलत असल्याचं दिसलं.
दहा मिनिटे थांबवल्यावर मला त्या ठिकाणाहून सोडण्यात आलं आणि मी नाशिकला हॉटेलवर पोहोचलो तेव्हा कळलं की टोलनाका फोडण्यात आला आहे. साहेबांमुळे 65 टोलनाके बंद झाले, माझ्यामुळे आज अजून एक अॅड झाला..’ असं ते यावेळी म्हणाले.