पुणे जिल्हा | सहकार महर्षि कारखान्याचा 63 वा बॉयलर अग्नी प्रदिपन उत्साहात

अकलूज, (प्रतिनिधी) -शंकरनगर-अकलूज येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचा सन 2024-25 चा 63वा बॉयलर प्रदीपन समारंभ कारखान्याचे चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे हस्ते झाला.
बॉयलर प्रदिपन समारंभानिमित्त दिवशी सकाळी 8.45 वाजता श्रीसत्यनारायण महापूजा कारखान्याचे संचालकसाहेब रामचंद्र ठवरे व त्यांच्या पत्नी कुसुम ठवरे या उभयतांचे हस्ते झाली. कारखान्याने चालू गळीत हंगाम 2024-25 मध्ये 9 लाख मे. टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ठ ठेवलेले आहे. त्यासाठी सर्व मशिनरीच्या ट्रायल्स पूर्ण झालेल्या असून प्रतिदिवशी 8,500 मे. टनापेक्षा जास्त ऊस गाळप करण्यासाठी यंत्रप्रणाली कार्यान्वीत केली आहे.
त्यानुसार ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणा भरलेली असून कारखान्याचे सर्व सभासद व बिगर सभासद यांनी नोंदीचा व बिगर नोंदीचा सर्व ऊस कारखान्यास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करून मागील गळीत हंगाम 2023-2024 मध्ये गळीतास आलेल्या उसाकरिता ठरलेल्या धोरणाप्रमाणे अनुदानाची रक्कम ऊस पुरवठादार शेतकरी यांचे खातेवर जमा केली असून व परंपरेप्रमाणे कारखाना कर्मचारी यांना बोनस देण्यात आला असल्याचे कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांनी सांगितले.
याप्रसंगी कारखान्याचे व्हाइस चेअरमन शंकरराव माने-देशमुख, संचालक लक्ष्मण शिंदे, नानासाहेब मुंडफणे, विजयकुमार पवार, रामचंद्र सिद, भिमराव काळे, गोविंद पवार, तज्ञ संचालक- प्रकाश पाटील, रामचंद्र सावंत-पाटील, संचालिका सुजाता शिंदे, कमिटी संचालक – पांडूरंग एकतपुरे, बाळासाहेब माने-देशमुख, राजेंद्र भोसले,
अमृतराज माने-देशमुख, धनंजय सावंत, नामदेव चव्हाण, अनिल कोकाटे, श्रीकांत बोडके, हर्षाली निंबाळकर, माजी संचालक- भिमराव काळे, केशव ताटे, सुभाष पताळे, शिवाजी सिद, राजेंद्र मोहिते, महादेव घाडगे, विजय माने-देशमुख, रामचंद्र चव्हाण, नितीन बेनकर तसेच सभासद, खातेप्रमुख, कामगार, कामगार व युनियन प्रतिनिधी उपस्थित होते.


