Pune District : सहकार महर्षि कारखान्याचे मील रोलर पूजन

अकलूज – शंकरनगर-अकलूज येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्यामध्ये गळीत हंगाम 2025-2026 करीता मील रोलरचे पूजन कारखान्याच्या संचालिका स्वरुपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांचे हस्ते झाले.
कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे कुशल मार्गदर्शनाखाली व चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे नेतृत्वाखाली कारखाना प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे.गळीत हंगाम 2025-2026 चालू करण्याचे दृष्टीने कारखाना व इतर उपपदार्थ प्रकल्पाकडील ओह हॉलिंगची कामे प्रगतीपथावर असून शेती विभागामार्फत ऊस तोडणी वाहतूकीचे वाहन करार सुरू असून ते अंतीम टप्प्यात आले असलेची माहिती कार्यकारी संचालक . राजेंद्र केरबा चौगुले यांनी दिली.
कारखान्माने गळीत हंगाम 2025-2026 मध्ये 9 लाख मे.टन. ऊस गाळप करणेचे उद्दीष्ट ठेवले आहे. त्यासाठी कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व सभासद व बिगर सभासद यांनी आपला ऊस कारखान्यास गळीतास देऊन सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याच्या संचालिका स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांनी केले.
सदर कार्यक्रम प्रसंगी कारखान्याचे व्हाइस चेअरमन शंकरराव माने-देशमुख तसेचसंचालिका सुजाता शिंदे, तज्ञ संचालक प्रकाशराव पाटील, रामचंद्रराव सावंत-पाटील, कार्यलक्षी संचालक- रणजित रणनवरे व शिवसृष्टी किल्ला व शिवछत्रपती मल्टिमेडीया लेजर शो कमिटीचे संचालक पांडूरंग एकतपुरे, बाळासाहेब माने-देशमुख, दत्तात्रय चव्हाण, विनायक केचे, धनंजय सावंत, नामदेव चव्हाण, धनंजय दुपडे, श्रीकांत बोडके व सौ. हर्षाली निंबाळकर तसेच सर्व खातेप्रमुख, कामगार व युनियन प्रतिनिधी उपस्थित होते.





