राष्ट्रपती भवनासाठीच्या तरतूदीत 6 कोटी 56 लाखांची वाढ
Updated On:

नवी दिल्ली : सरकारने राष्ट्रपती भवनातील खर्च, तेथील कर्मचाऱ्यांचे वेतन आणि अन्य खर्चासाठी चालू अर्थसंकल्पात एकूण 80 कोटी 98 लाख रूपयांची तरतूद केली आहे.
गेल्या वर्षीैच्या तुलनेतील ही वाढ 6 कोटी 56 लाख इतकी आहे. या एकूण प्रस्तावीत तरतूदीपैकी 60 लाख रूपयांची तरतूद राष्ट्रतींच्या वेतनासाठी असणार आहे. राष्ट्रपती भवनाची देखभाल-व्यवस्थापन आणि अन्य संबंधीत बाबींवर 32 कोटी 78 लाख रूपये खर्च केले जाणार असून राष्ट्रपती भवनातील अंतर्गत खर्चासाठी 47 कोटी 60 लाख रूपये खर्च केले जाणार आहेत.
त्यात राष्ट्रपती भवनातील कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होणाऱ्या खर्चाचाही समावेश आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात राष्ट्रपती भवनाच्या खर्चासाठी 76 कोटी 33 लाख रूपयांच्या खर्चाची तरतूद करण्यात आली होती.





