Japan Earthquake Video: जपानमध्ये 6.9 तीव्रतेचा भूकंप, त्सुनामीचा इशारा

Japan Earthquake: जपानमध्ये सोमवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 6.9 इतकी होती. भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, जपान हवामान संस्थेने दक्षिण-पश्चिम जपानमध्ये 6.9 तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती दिली असून त्सुनामीचा इशारा दिला आहे.
CCTV footage of 6.8 Earthquake in Miyazaki Prefecture, Japan #sismo #temblor #Japan pic.twitter.com/OYqVjzAn6E
— Disasters Daily (@DisastersAndI) January 13, 2025
युरोपीयन भूमध्य भूकंप विज्ञान केंद्राने सांगितले की, सोमवारी जपानच्या क्युशू प्रदेशात 6.9 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. भूकंपाचे केंद्र 37 किलोमीटर (23 मैल) खोलीवर होते. जपानमधील भूकंपामुळे आतापर्यंत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. स्थानिक वेळेनुसार रात्री 9:19 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले.





