आणि बिचारा ढसाढसा रडला… कुटूंबात सद्स्य ९ आणि मतं मिळाले फक्त ५

जालंधर – २०१९ लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, यावेळी अनेक उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. यावेळी जालंधर मधून निवडणूक रिंगणात उतरलेले उमेदवार ‘नीटू’ यांना केवळ ८४० मते मिळाली आहे. आशर्याची बाब म्हणजे, नीटू यांच्या घरात ९ सदस्य असून देखील त्यांना फक्त ५ मते मिळाली आहेत. त्यामुळे आपल्या स्वतःच्याच घरातील आणखी ४ मते कुठे गेली हे खुद्द नीटू यांना सुध्दा अद्याप समजले नाही.

जालंधर परिसरात नीटू यांच्या परिवाराची ‘नीटू शटर वाला’ अशी सुद्धा ओळख आहे. निकाला नंतर त्यांच्या खात्यात फक्त ८४० मते आले होते. नीटू यांचे असे, सुद्धा म्हणणे आहे कि माझ्या शेजारी राहणाऱ्या लोकांनी देखील मला मतदान करण्याचे वचन केले होते. मात्र त्यांनी देखील मला मत दिले नाही. असं नीटू म्हणाले.

आणि बिचारा ढसाढसा रडला… कुटूंबात सद्स्य ९ आणि मतं मिळाले फक्त ५

Posted by Digital Prabhat on Friday, 24 May 2019

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.