सुरत – करोनानंतर जागतिक बाजारात कमी अधिक प्रमाणात मंदी निर्माण झाली आहे. आता ही मंदी अमेरिकेत आणखी गडद होण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे शेअर बाजारांसह जगातील इतर बाजारावर परिणाम झाला आहे. महागाई जास्त असल्यामुळे जागतिक पातळीवर नागरिकाकडून हिर्यासारख्या वस्तूवरील खर्च कमी झाला आहे. अशा परिस्थितीत सुरत मधील हिरे उद्योगावर परिणाम झाला आहे. यामुळे एका कंपनीने आपल्या 50 हजार कर्मचार्यांना 17 ते 27 ऑगस्ट दरम्यान दहा दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. ही कंपनी किरण जेम्स असून ती जगातील सर्वात मोठी नैसर्गिक दागिने उत्पादक कंपनी आहे. या कंपनीचे अध्यक्ष वल्लभभाई लखानी यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षापासून मागणी अभावी आमच्या उद्योगावर परिणाम झाला आहे. या मंदीचा मला कंटाळा आला आहे. त्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागत आहे. या दहा दिवसात 50 हजार कर्मचारी काम करणार नाहीत. त्यांना या काळातील पगार दिला जाईल. मात्र काही रक्कम कापून घेतले जाईल. आमचे इच्छा नसताना आम्हाला हा निर्णय घ्यावा लागत आहे. याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. ते म्हणाले की, मंदीमुळे एक तर आम्हाला नैसर्गिक कच्चे हिरे मिळत नाहीत आणि आम्ही पॉलिश केलेला हिर्यांना जगातील मागणी कमी झाली आहे. इतर हिरे उद्योगावर हा परिणाम झाला आहे. मात्र ते शांत बसून आहेत. मात्र आम्ही पुढाकार घेऊन जगाला या संदर्भात माहिती मिळावी यासाठी हा निर्णय घेतला आहे. मंदीसाठी अनेक कारणे असू शकतात याबद्दल चर्चा चालू आहे असे ते म्हणाले. सुरतमधील हिरे उद्योगाच्या संघटनेचे अध्यक्ष जगदीश खुंट यांनी सांगितले की, आम्ही सामूहिकरीत्या मंदीचा सामना करण्याचा प्रयत्न करत आहोत.जगातील 90% हिर्यावर सुरत मध्ये प्रक्रिया केली जाते. मात्र जागतिक मंदीमुळे सुरतमध्ये या उद्योगावर परिणाम झाला आहे. आम्ही पॉलिश केलेले 95 टक्के जागा हिरे निर्यात होतात. मात्र अनेक देशात युध्द चालू असल्यामुळे त्याचा जागतिक व्यापारावर परिणाम झाला आहे. उलाढाल झाली कमी – सुरत मधील दागिने उद्योगाची 2025 मध्ये उलाढाल 2.25 लाख कोटी रुपये होती. ती आता 1.50 लाख कोटी रुपयांपर्यंत कमी झाली. दोन वर्षांपासून आम्ही मंदीशी झुंज देत आहोत. परिस्थिती कठीण असून आम्हाला कर्मचार्यांना सुट्टी देऊन काही काळ उद्योग बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे असे काही व्यापार्यांनी आणि उद्योजकांनी सांगितले. सुरत मध्ये 4000 हिरे प्रक्रिया केंद्र आहेत. यामध्ये दहा लाख लोक काम करतात.