Pakistan : पाकमधील पंजाब प्रांतात ५० दहशतवाद्यांना अटक
पाकिस्तानातील पंजाब प्रांतात गेल्या दोन महिन्यात झालेल्या कारवाईदरम्यान विविध दहशतवादी संघटनांच्या किमान ५० दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Pakistan – पाकिस्तानातील पंजाब प्रांतात गेल्या दोन महिन्यात झालेल्या कारवाईदरम्यान विविध दहशतवादी संघटनांच्या किमान ५० दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
पंजाब प्रांतात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ४१९ मोहिमा राबवण्यात आल्या होत्या, असे पंजाब पोलिसांच्या कांटर टेरेरिझम डिपार्टमेंटने म्हटले आहे.
अटक करण्यात आलेले ५४ जण इस्लामिक स्टेट, अल-कायदा, लश्कर-ए-झंगवी, तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान, सिपाही-ए-सहाबा यांसारख्या विविध दहशतवादी गटांचे सदस्य होते, असे सीटीडीने सांगितले.
लाहोर, रावळपिंडी, गुजरांवाला, फैसलाबाद, झेलम, सरगोधा, मियांवली, भाकर, साहिवाल, मंडी बहाउद्दीन, पाकपट्टन आणि बहावलपूर येथून या दहशतवाद्यांना अटक करण्यात आली.
या कारवाईदरम्यान सीटीडीने त्यांच्या ताब्यातून स्फोटके, १२ तात्पुरती स्फोटक उपकरणे, ४२ डेटोनेटर, ९८ फूट सेफ्टी फ्यूज वायर, प्रतिबंधित स्टिकर्स, प्रतिबंधित साहित्य आणि रोख रक्कम जप्त केली.





