Accident News : बस दरीत कोसळून 5 जणांचा मृत्यू, तर १५ जण जखमी
Updated On:

गंगटोक – पश्चिम बंगाल-सिक्कीम सीमेजवळ शनिवारी दुपारी प्रवाशी बस 150 फूट खोल दरीत कोसळून पाच जणांचा मृत्यू, तर १५ जण जखमी झाले आहे. दरम्यान, अनेक जखमी प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. हा अपघात अंधेरी आणि अटल सेतू दरम्यान रंगपो सीमेपासून सुमारे 1 किमी अंतरावर दुपारी 3 च्या सुमारास घडला.
सिलिगुडीहून गंगटोककडे निघालेली बस तीस्ता नदीच्या काठावर अचानक कोसळली. यात एका महिलेसह ५ जणांचा मृत्यू झाला. तसेच १५ प्रवाशी जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी रंगपो येथील आरोग्य केंद्रात नेण्यात आले, असे संबंधित अधिका–यांनी सांगितले.





