Sansad Ratna Awards 2026: महाराष्ट्रातील 5 खासदारांना यंदाचा संसद रत्न पुरस्कार जाहीर, श्रीकांत शिंदेंसह ‘या’ नावांचा समावेश
Sansad Ratna Awards 2026: चार संसदीय समित्यांनीही त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कारही जिंकले.

Sansad Ratna Awards 2026: यंदाच्या संसद रत्न पुरस्कार विजेत्यांमध्ये महाराष्ट्राचे विशेष वर्चस्व पाहायला मिळत आहे. यात महाराष्ट्रातील पाच खासदारांना संसद रत्न या बहुमानाने गौरवण्यात आले आहे.
लोकसभा खासदार श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, डॉ. हेमंत विष्णू सावरा, पुण्याच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी, जळगावच्या लोकसभा खासदार स्मिता उदय वाघ अशा पाच खासदारांचा समावेश आहे. ज्युरी समितीने यंदाच्या पुरस्कारांसाठी 10 लोकसभा खासदार, 2 राज्यसभा खासदार आणि 4 संसदीय स्थायी समित्यांची निवड केली आहे. 2026 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरपर्यंत संसदेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे.
Ajay Rai: पंतप्रधानांविषयी वादग्रस्त वक्तव्यानंतर अजय राय अडचणीत ;आता वाराणसीतही गुन्हा दाखल
कोणत्या खासदारांना संसद रत्न पुरस्कार जाहीर?
देशभरातून जगदंबिका पाल (उत्तर प्रदेश), पी.पी. चौधरी (राजस्थान), निशिकांत दुबे (झारखंड) आणि डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे (महाराष्ट्र) हे वैयक्तिक श्रेणीत निवडलेल्या खासदारांची नावे आहेत. तसेच इतर निवडलेल्या खासदारांमध्ये प्रवीण पटेल (उत्तर प्रदेश), विद्युत बरन महतो (झारखंड), लुंबाराम चौधरी (राजस्थान)
नरेश गणपत म्हस्के (महाराष्ट्र) , डॉ हेमंत विष्णू सावरा (महाराष्ट्र), स्मिता उदय वाघ (महाराष्ट्र), डॉ मेधा विश्राम कुलकर्णी (महाराष्ट्र), यांचा समावेश आहे. हे सर्व संसद सदस्य 2026 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटपर्यंत विविध श्रेणींमध्ये संसदेत त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी ओळखले जाते, असे प्रियदर्शनी राहुल यांनी सांगितले. Sansad Ratna Awards 2026
चार संसदीय समित्यांना पुरस्कार
चार संसदीय समित्यांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कारही जिंकले आहेत. यामध्ये डॉ चरणजितसिंग चन्नी यांच्या अध्यक्षतेखाली कृषी समिती, भर्तृहरी महताब यांच्या अध्यक्षतेखाली वित्त समिती, सप्तगिरी शंकर उलाका यांच्या अध्यक्षतेखालील ग्रामीण विकास आणि पंचायती राज समिती आणि कोळसा आणि खाण समिती अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली.
16वा पुरस्कार सोहळा जुलै 2026 मध्ये नवी दिल्ली येथे होणार असून, या कार्यक्रमादरम्यान 150वा पुरस्कार प्रदान केला जाईल. ज्युरी समितीने संसद रत्न पुरस्कार 2026 साठी 10 लोकसभा खासदार, 2 राज्यसभा खासदार आणि 4 संसदीय स्थायी समित्यांची निवड केली आहे. हे पुरस्कार नागरी समाजाच्या वतीने दिले जातात. Sansad Ratna Awards 2026
हेही वाचा:


