Nagar | 8 दिवसांत दिव्यांगाच्या बॅंक खात्यात 5% निधी वर्ग

राहुरी, (प्रतिनिधी): देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील नोंदणीकृत असलेल्या दिव्यांगाकडे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र MH युडीआयडी नंबर असलेल्याच दिव्यांग प्रमाणपत्र किंवा युनिक आयडी कार्ड आहे, अशाच दिव्यांगास सन 2024 चा 5% निधी देण्यात यावे, अशी मागणी प्रहार संघटनेने केली आहे.
फक्त युनिक आयडी कार्ड किंवा MH 12 अंक्की नंबर असलेल्या दिव्यांगांना 5% निधीचा लाभ दिला जाईल. पुढील 8 दिवसांत दिव्यांगांच्या बॅक खात्यात 5% निधी वर्ग करण्यात येईल, असे आश्वासन देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी यांनी दिले.
ज्या दिव्यांग बांधवांकडे ऑफलाइन दिव्यांग प्रमाणपत्र आहे, अशा दिव्यांगांना 5% निधी देण्यात येऊ नये. कारण जिल्ह्यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचे प्रमाण खूप वाढले आहे. बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन दिव्यांगांच्या योजनाचा फायदा घेतला जात आहे.
नगरपालिकेची व शासनाची फसवणूक केली जात आहे. यामुळे खऱ्या दिव्यांगावर अन्याय होत आहे.
यापुढे दिव्यांगाच्या टक्केवारीनुसार 5% निधी 40% ते 59%, .60% ते 79%,आणि 80% ते 100% असलेल्या दिव्यांगांना तीन टप्प्यामध्ये दिव्यांगांच्या टक्केवारीनुसार जो जास्त दिव्यांग असेल, त्याला जास्त प्रमाणात पाच टक्के निधी टक्केवारीप्रमाणे देण्यात यावा, अशी मागणी केली.
यावेळी देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी यांनी ऑफलाइन दिव्यांगाची छाननी करून फक्त युनिक आयडी कार्ड किंवा MH 12 अंक्की नंबर असलेल्या दिव्यांगाना 5% निधीचा लाभ दिला जाईल.पुढील 8 दिवसांत दिव्यांगांच्या बॅंक खात्यात 5% निधी वर्ग करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
निवेदन देताना उत्तर जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे , जिल्हा सल्लागार सलीम शेख, देवळाली प्रवरा शहर अध्यक्ष राजेंद्र सोनवने, उपाध्यक्ष केशव जाधव, सचिव सुखदेव किरतने, संपर्क प्रमुख संदीप बोरसे, मनोज संसारे, नवनाथ पिंपळे, रमेश गुलदगड,मारूती सांगळे, कैफ शेख, बाळासाहेब सोनवने, बाबाजान शेख, शाहीद शेख, कमरूनिसा शेख, पल्लवी माळी, गोरक्षनाथ चव्हाण,दत्तात्रय चव्हाण आदी उपस्थित होते.





