राज्यात कोरोनाचे ४७ नवे रुग्ण; एकूण संख्या ५३७ वर

मुंबई – राज्यामध्ये कोरोना विषाणू हातपाय पसरत असून ताज्या आकडेवारीनुसार आज राज्यभरात कोरोनाचे ४७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. आज सापडलेल्या ४७ नव्या रुग्णांमुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता ५३७ झाली आहे. यातच अधिक चिंतेची बाब म्हणजे अत्यंत घनदाट लोकवस्ती असलेल्या मुंबई महानगरामध्ये कोरोना झपाट्याने वाढताना दिसत असून आज वाढलेल्या ४७ रुग्णांपैकी २८ रुग्ण हे एकट्या मुंबई महानगरामध्ये सापडले आहेत.
याबाबत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आपल्या अधिकृत ट्विटरखात्याद्वारे, “राज्यात आज कोरोना बाधित 47 नवीन रुग्णांची नोंद झाली.यातील रुग्ण मुंबई 28, ठाणे परिसर 15, अमरावती 01, पिंपरी चिंचवड 01, पुणे 02 असा रुग्णांचा समावेश आहे.यामुळे राज्यातील एकुण बाधित रुग्णांची संख्या 537 झाली आहे.यातील आतापर्यंत 50 सदस्य बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठवण्यात आले आहे.” अशी माहिती दिली आहे.
दरम्यान, कोरोनाच्या संकटाला परतवण्यासाठी राज्य सरकारतर्फे विविध उपाययोजना आखण्यात आल्या असून कोरोनाचा वाढत धोका पाहता नागरिकांनी सरकारतर्फे देण्यात आलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे.
राज्यात आज कोरोना बाधित 47 नवीन रुग्णांची नोंद झाली.यातील रुग्ण मुंबई 28, ठाणे परिसर 15, अमरावती 01, पिंपरी चिंचवड 01, पुणे 02 असा रुग्णांचा समावेश आहे.यामुळे राज्यातील एकुण बाधित रुग्णांची संख्या 537 झाली आहे.यातील आतापर्यंत 50 सदस्य बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठवण्यात आले आहे.
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 4, 2020





