Salman Khan : ‘४००० हजार कोटी…’; रामायण’च्या बजेटवर बॅालिवूडच्या भाईजानचं मोठं स्टेटमेंट
Salman Khan : 'मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस'च्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात सलमानला 'रामायण' चित्रपटाबाबत प्रश्न विचारण्यात आला.

Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या आगामी ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, ट्रेलर लाँच सोहळ्यात सलमानने विविध विषयांवर आपली मते मांडली.
यावेळी त्याने रणबीर कपूर, यश आणि साई पल्लवी यांच्या आगामी ‘रामायण’ चित्रपटावरही भाष्य केले. विशेष म्हणजे, या चित्रपटाच्या तब्बल ४ हजार कोटी रुपयांच्या बजेटवर सलमानने मोठं विधान करत निर्मात्यांना महत्वाचा सल्ला दिला आहे.
‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’च्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात सलमानला ‘रामायण’ चित्रपटाबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना त्याने सांगितले की, ‘रामायण’ची चर्चा ही चित्रपटाच्या भव्य व्हीएफएक्स किंवा निर्मिती खर्चाऐवजी त्यातील मूळ कथेवर व्हायला हवी.
सलमान म्हणाला, “मला वाटते की रामायणाबद्दल चर्चा करताना लक्ष रामायणावरच केंद्रित असायला हवे. व्हीएफएक्स आणि चित्रपटाच्या निर्मिती खर्चावर नव्हे. या चित्रपटातील व्हीएफएक्स, सीजीआय आणि ग्राफिक्सवर जवळपास ४ हजार कोटी रुपये खर्च झाल्याची चर्चा आहे. मला वैयक्तिकरीत्या हे योग्य वाटत नाही.”
“#Ramayana movie ke baat karni hai to Ramayana par karo, na ki cost of making or VFX par. Ram ke upar baat karo, uski quality par. #Maatrubhumi me jo hero hai usme sab qualities hai Ram jaise” – #SalmanKhan https://t.co/5b8zaKeKU0
— $@M (@SAMTHEBESTEST_) November 6, 2026
पुढे त्याने स्पष्ट केले की, रामायणाची खरी ताकद ही त्याच्या कथेत आहे. त्यामुळे चित्रपटाची चर्चा करताना राम, रावण आणि सीता यांच्या व्यक्तिरेखा तसेच रामायणातील मूल्यांना अधिक महत्त्व दिले पाहिजे.
सलमान खानने यावेळी प्रभू रामांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दलही भाष्य केले. प्रभू राम हे एक आदर्श पुत्र, चांगले पती, उत्तम पिता आणि महान योद्धा होते. हेच गुण आपल्या आगामी ‘मातृभूमी’ चित्रपटातील भूमिकेशीही संबंधित असल्याचे त्याने नमूद केले.
दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हिंदू महाकाव्य रामायणावर आधारित हा चित्रपट दोन भागांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचा पहिला भाग ५ नोव्हेंबरला रिलीज झाला असून दुसरा भाग दिवाळी २०१७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू रामाच्या भूमिकेत, साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत, तर यश रावणाच्या भूमिकेत आहे. याशिवाय सनी देओल हनुमानाची भूमिका साकारत आहे. चित्रपटात रवी दुबे, अनुपम खेर, काजल अग्रवाल, रकुल प्रीत सिंग, विवेक ओबेरॉय, कुणाल कपूर, आदिनाथ कोठारे, अरुण गोविल, इंदिरा कृष्णन आणि लारा दत्ता यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.





