Pune District : भिगवणला रस्त्यांच्या कामासाठी 40 लाखांचा निधी मंजूर

भिगवण : पुणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत भिगवणमधील रस्त्यांच्या कामाकरिता 40 लाख रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती सरपंच दीपिका क्षीरसागर यांनी दिली.
अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे या अंतर्गत ही कामे मंजूर झाली असून यामध्ये साईनगर परिसर (वार्ड क्र.2) 10 लाख रुपये शिवाजीनगर परिसर (10 लाख रुपये), रो हाऊस परिसर (वार्ड क्र.4) 10 लाख रुपये आणि स्वामी विवेकानंद नगर (वार्ड क्र.4) 10 लाख रुपये याप्रमाणे सुमारे 40 लाख रुपयांचा निधी रस्त्यांच्या कामासाठी मंजूर झाला आहे.
हा निधी ज्या कामासाठी मंजूर झालेला आहे त्याच कामासाठी खर्च करता येणार आहे. इतर कामासाठी तो खर्च करता येणार नसल्याचे मान्यता पत्रामध्ये नमूद करण्यात आलेले आहे.दोन वर्षाच्या कालावधीत सर्वाधिक रस्ते झाले असून भिगवणमध्ये दर्जेदार रस्त्यांचे जाळे निर्माण झाले आहे. त्यामुळे भिगवण गावच्या विकासाला खर्या अर्थाने चालना मिळाली असल्याचे मत ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
गावच्या विकासासाठी सातत्यपूर्ण विकासकामे करणे गरजेचे आहे या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये सातत्यपूर्ण विकासकामे झाल्याने ग्रामस्थ समाधानी आहेत.
-मुमताज जावेद शेख, माजी उपसरपंच





