पुणे जिल्हा | ओतूर वनपरिक्षेत्रात 40 पिंजरे, 20 ट्रॅप कॅमेरे
बेल्हे, (वार्ताहर) – जुन्नर तालुक्यात ओतूर वनपरिक्षेत्रात बिबट्याने दहशत माजवली असून प्राण्यांसह आता मानवावर सर्रास हल्ले सुरू केले आहेत. तर या बिबट्याच्या हल्ल्यात या 15 दिवसांत दोघांचा मृत्यू झाल्यानंतर वनविभाग खडबडून जागे झाले आहे.
या वनविभागाच्या क्षेत्रात बिबट जेरबंद करण्यासाठी 40 पिंजरे, 20 ट्रॅप कॅमेरे, ड्रोन सर्व्हे व लोकांनमध्ये जनजागृती दिवसरात्र गस्त सुरू केली. तर आतापर्यंत या भागात सात बिबटे जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.
ओतूर वनपरिक्षेत्र अंतर्गत लेंडेस्थळ, पिंपळवंडी येथे प्रियंका मनोज हुलवळे यांच्यावर रविवारी (दि. 5) सायंकाळी 5 वाजता शेतात काम करताना बिबट्याने हल्ला केला. यानंतर त्यांना उपचारासाठी विघ्नहर हॉस्पिटल नारायणगाव येथे दाखल करण्यात आले.
यानंतर बुधवारी (दि. 8) रुद्र महेश फापाळे (रा. काळवाडी) या 8 वर्षीय मुलावर सकाळी बिबट्याने हल्ल्या केल्याने त्याचा मृत्यू झाला नंतर शुक्रवारी (दि. 10) नानुबाई सिताराम कडाळे (रा. गाजरपट पिपंरी पेंढार) या शेतात काम करत असताना बिबट्याने त्यांचेचर हल्ला केला यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. यावेळी नागरिक प्रचंड आक्रमक झाल्याने वनविभाग खडबडून जागे झाले अन् बिबट्यांना पकडण्यासाठी मोहीम सुरू केली.
दरम्यान वनविभागाने या हल्ल्यांच्या क्षेत्रामध्ये 40 पिंजरे, 20 ट्रॅप कॅमेरे, ड्रोन सर्व्हे व लोकांनमध्ये जनजागृती दिवसरात्र गस्त सुरु केली. यामध्ये बुधवारी (दि. 8) लेंडेस्थळ पिंपळवंडी येथ, शुक्रवारी (दि. 10) पिंपरी पेंढार येथे तीन, शनिवारी (दि. 11) पिंपरी पेंढार येथील गाजरपट येथे एक,
सोमवारी (दि.13) पहाटे 4 वाजता काळवाडी भागातून एक, बुधवारी (दि. 15) सकाळी वामन पट्टा येथे एक आणि रात्री 9 वाजता एक असे एकूण सात बिबट्या जेरबंद करण्यात वनविभाला यश आले. या भागामध्ये आत्तापर्यंत जेरबंद करण्याचे कार्यवाही सुरू असून आतापर्यंत 7 बिबट जेरबंद करण्यात आले यामध्ये हल्ला करणार बिबट जेरबंद करण्यात आले आहे.
तीन बिबटे पुलावर सोडल्याची अफवा
येडगाव येथील सहयाद्री पुलावर वनविभागाने 3 बिबट सोडण्यात आले अशी आफवा पसरवण्यात आल यामुळे काळवाडी व पिंपरी पेंढार येथे बिबट हल्ल्यावेळी लोकांच्या मनात हा हल्ला सोडलेल्या बिबट्याने केलेले आहेत असा समज निर्माण झाला. यामुळे वनविभागावर रोष निर्माण होऊन व गैरसमज निर्माण होऊन आक्रोश दिसून आला.
यामुळे वनकर्मचारी यांना शासकीय कामांत अडथळा व मारहाण झाली असून यामध्ये एक महिला वनरक्षक जखमी झाली आहे, अशी माहिती ओतूरचे वनपरीक्षेत्र अधिकारी व्ही. एम. काकडे यांनी दिली.





