कराची – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एका कोळसा खाणीत मिथेन वायूच्या स्फोटात किमान ४ खाण कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य ८ कामगार बेपत्ता झाले असून त्यांचा शोध घेतला जात आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. बलुचिस्तान प्रांतातील क्वेट्टापासून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या संजदी परिसरात ९ जानेवारी रोजी ही कोळसा खाण कोसळली. मिथेन वायू साचल्यामुळे आणि स्फोटामुळे खाणी कोसळली आणि १२ कामगार कोसळलेल्या खाणीत अडकले. गॅस साचल्यामुळे हा स्फोट झाला आणि खाणीत खड्डे पडले, असे बलुचिस्तान सरकारचे प्रवक्ते शाहिद रिंद यांनी शनिवारी सांगितले. खाणीत अडकलेल्या कामगारांच्या सुटकेसाठी गेल्या २४ तासांपासून पुर्ण क्षमतेने मदत आणि बचाव कार्य केले जात आहे. मात्र काणीत साचलेल्या विषारी वायूमुळेआणि मातीच्या ढिगाऱ्यांमुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत चार कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यातयेश आले असल्याचे त्यांनी सांगितले. बेपत्ता झालेले कामगार १,५०० फुट खोलीवर गाडले गेले असल्यामुळे त्यांचे मृतदेह सापडण्याची शक्यता धूसर असल्याचे बलुचिस्तान प्रांताच्या खाण विभागाचे प्रमुख अब्दुल्ला शावनी यांनी सांगितले.