“४ वेळा मुख्यमंत्री, जवळपास २० वर्ष केंद्रात मंत्री, ५० वर्ष आमदार, खासदार मग इतके वर्ष काय केलं?”

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर सातत्याने विरोधक टीका करताना दिसतात. त्यातच आता महाराष्ट्र भाजपाचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी “शरद पवार ४ वेळा मुख्यमंत्री, जवळपास २० वर्ष केंद्रात मंत्री, ५० वर्ष आमदार किंवा खासदार आहेत, तरी ते बेरोजगारी, शेतकरी आत्महत्येवर बोलतात. मग इतके वर्षे काय केलं?” असा सवाल निलेश राणे यांनी केला.
निलेश राणे यांनी ट्वीट करत शरद पवारांना निशाणा साधला आहे. निलेश राणे यांनी आपल्या ट्वीटमध्ये, “४ वेळा मुख्यमंत्री, जवळपास २० वर्ष केंद्रात मंत्री, ५० वर्ष आमदार किंवा खासदार, अनेक संस्थांवर अध्यक्ष, तरी शरद पवार बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या वगैरेवर भाष्य करतात. मग प्रश्न पडतो इतके वर्ष तुम्ही काय केलं? तेव्हा काहीतरी केलं असतं, तर लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं असतं.”
४ वेळा मुख्यमंत्री, जवळपास २० वर्ष केंद्रात मंत्री, पन्नास वर्ष आमदार किंवा खासदार, अनेक संस्थांवर अध्यक्ष तरी पवार साहेब बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या वगैरे वर भाष्य करतात. मग प्रश्न पडतो इतके वर्ष तुम्ही काय केलं? तेव्हा काहीतरी केलं असतं तर लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं असतं.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 10, 2022
“मुंबईची व महाराष्ट्राची सगळी कामं पूर्ण झाली आहेत, एकही काम शिल्लक नाही. म्हणून शिवसेनेचे नेते मंडळी नवनीत राणा MRI मशीनमध्ये त्यांची तपासणी होताना बाहेरून फोटो कोणी काढला हे शोधण्यासाठी स्वतः लीलावती हॉस्पिटलला गेले. हा प्रश्न महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा व गंभीर झाला आहे,” असं म्हणत निलेश राणे यांनी ठाकरे सरकारलाही टोला लगावला.
मुंबईची व महाराष्ट्राची सगळी कामं पूर्ण झाली आहेत, एकही काम शिल्लक नाही म्हणून शिवसेनेचे नेते मंडळी नवनीत राणा MRI मशीन मध्ये त्यांची तपासणी होताना बाहेरून फोटो कोणी काढला हे शोधण्यासाठी स्वतः लीलावती हॉस्पिटलला गेले, हा प्रश्न महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा व गंभीर झाला आहे.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 10, 2022
दरम्यान, निलेश राणे सातत्याने महाविकासआघाडी सरकारवर टीकेची झोड उठवतात. तत्कालीन अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक तुरुंगात असताना त्यांचा मंत्रिमंडळ निर्णय जाहीर केल्याने निलेश राणे यांनी टीका केली होती. मंत्रिमंडळ निर्णयाचा फोटो ट्विटरवर शेअर करत सरकारवर निशाणा साधला होता. २८ एप्रिल २०२२ रोजी हा मंत्रिमंडळ निर्णय जाहीर करण्यात आला होता. येरवडा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी पदनिर्मिती करण्यास मान्यता दिल्याचा मंत्रिमंडळ निर्णय होता. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा फोटो होता.
काय शोकांतिका आहे… हे बघून हसावं की रडावं कळत नाही. दाऊदच्या हस्तका सोबत व्यवहार केल्या प्रकरणात नवाब मलिक जेलमध्ये आहे तरीही मंत्री आहे आणि जेलमध्ये बसून मंत्री मंडळाच्या निर्णयावर महाराष्ट्र शासनाने मंत्री नवाब मलिक याचा निर्णय जाहीर केलाय. pic.twitter.com/1G6M9c2AQK
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) April 29, 2022
“काय शोकांतिका आहे… हे बघून हसावं की रडावं कळत नाही. दाऊदच्या हस्तकासोबत व्यवहार केल्या प्रकरणात नवाब मलिक जेलमध्ये आहेत. तरीही मंत्री आहे आणि जेलमध्ये बसून मंत्री मंडळाच्या निर्णयावर महाराष्ट्र शासनाने मंत्री नवाब मलिक याचा निर्णय जाहीर केलाय,” असे ट्वीट निलेश राणे यांनी केले होते.





