US Congress : अमेरिकेच्या नवीन संसदेत 4 ‘या’ हिंदू अल्पसंख्यांकाचा समावेश

वॉशिंग्टन : अंमेरिकेच्या संसदेच्या ११९ व्या कॉंग्रेसला आजपासून अधिकृतपणे सुरुवात झाली. या संसदेमध्ये ४ हिंदू सदस्यांचाही समावेश आहे. हिंदू अल्पसंख्यांक सदस्यांचे ही आतापर्यंतची सर्वात जास्त प्रतिनिधी संख्या आहे. केवळ १४ प्रतिनिधींनी स्वतःची ओळख गैर-ख्रिश्चन किंवा गैर-ज्यू धर्मीय म्हणून केली आहे. हे सर्वजण डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य आहेत. चार हिंदूंव्यतिरिक्त, चार सदस्य मुस्लिम आहेत, तीन बौद्ध आहेत आणि आणखी तीन युनिटेरियन युनिव्हर्सलिस्ट आहेत.
सुभाष सुब्रमण्यन, राजा कृष्णमूर्ती, रो खन्ना आणि श्री ठाणेदार हे चार भारतीय अमेरिकन हिंदू धर्माचे आहेत. प्रतिनिधीगृहामध्ये निवडून आलेल्या संसद सदस्या प्रमिला जयपाल या एकमेव भारतीय अमेरिकन महिला यांनी आपल्या धर्माचा स्पष्ट उल्लेख केलेला नाही. सहा भारतीय अमेरिकन खासदारांपैकी सर्वात ज्येष्ठ असलेले डॉ. अमी बेरा यांनी स्वत:ला एकतावादी म्हणून संबोधले आहे.
प्रतिनिधीगृहामधील सदस्यांच्या संख्येच्या प्रमाणात ख्रिश्चन धर्म हा प्रबळ धर्म राहिला आहे, तर सहा टक्के ज्यू हा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा धार्मिक गट आहे. सध्याच्या काँग्रेसमध्ये ३१ ज्यू आहेत. ज्यूंनंतर हिंदू आणि मुस्लिमांचे प्रत्येकी चार सदस्य आहेत. आंद्रे कार्सन, इल्हान उमर, रशिदा तालिब आणि लतीफाह सायमन हे काँग्रेसचे मुस्लिम सदस्य आहेत.
हवाईचे प्रतिनिधीत्व करणारे सिनेटर मॅझी हिरोनो आणि जॉर्जियाच्या चौथ्या काँग्रेशनल डिस्ट्रिक्टचे प्रतिनिधित्व करणारे हँक जॉन्सन हे बौद्ध आहेत. तर डेरेम टीम हे कॅलिफोर्नियातील सदस्य काँग्रेसमधील तिसरे बौद्ध आहेत. रिपब्लिकन खासदारांपैकी ९८ टक्के ख्रिश्चन आहेत. तर डेमोक्रॅट्सच्या सदस्यांमधील ख्रिश्चनांचे प्रमाण ७५ टक्के आहे.





