अवघ्या ३८ मिनिटात ४ लाख व्ह्यूज; नानीच्या ‘हिट: द थर्ड केस’ चित्रपटाची एवढी क्रेझ का? तुम्ही ट्रेलर पाहिलात?

Hit 3 Movie Trailer | हिट या प्रसिद्ध सिरीजचा तिसऱ्या भागाचा ट्रेलर हिट द थर्ड केस रिलीज झाला आहे. दाक्षिणात्य अभिनेता नानी याच्या सिनेसृष्टीतील कारकीर्दीतील सर्वात मोठा चित्रपट म्हणून या चित्रपटाकडे पाहिले जाते. या चित्रपटात अभिनेता नानी हा अर्जुन सरकारची भूमिका साकारताना दिसणार आहे, जो एक पोलिस अधिकारी आहे.
या चित्रपटातून नानीच्या धमाकेदार एन्ट्रीमुळे चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. या चित्रपटाचा जॅानर सस्पेन्स आणि थ्रील निर्माण करणारा आहे. चित्रपटातील ट्रेलरमध्ये दाखविण्यात आलेले मारधाडचे अनेक सीन्स अंगावर काटा आणणारे आहेत. सोशल मीडियावर या चित्रपटाची तुलना आता अॅनिमल चित्रपटाशी केली जाऊ लागली आहे.
‘हिट: द थर्ड केस’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये नानी अर्जुन सरकार नावाच्या एका संतप्त पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे, त्याच्या मते चुकीला माफी नाही. तसेच चुकीच्या लोकांना तो शिक्षा देताना दिसतो. हा चित्रपट १ मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता वाढवली आहे. या चित्रटाचा ट्रेलर यूट्यूबवर प्रदर्शित होताच अवघ्या ३८ मिनिटांतच ४ लाखांहून अधिक व्ह्यूज या चित्रपटाला मिळाले आहेत.
या चित्रपटात नानी व्यतिरिक्त केजीएफेम अभिनेत्री श्रीनिधी शेट्टी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शैलेश कोलानू यांनी केले आहे.




