Cyclone Mandous Impact : मेंडोस चक्रिवादळाचे तमिळनाडूत 4 बळी

चेन्नई – बंगालच्या उपसागरातून निर्माण होणाऱ्या मेंडोस चक्रीवादळाचा तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या काही भागाला तडाखा बसण्याचा इशारा हवामान खात्याने दिला होता. तमिळनाडून अलर्टही जारी करण्यात आला होता. या वादळाने तमिळनाडूत चौघांचा बळी घेतल्याचे वृत्त असून स्वत: मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे.
दिलासा देणारी बाब म्हणजे वादळाचा जोर कमी होत असल्याचे दिसून आले आहे. चेन्नईतील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार वादळ उत्तर पश्चिम दिशेने पुढे सरकले असून त्याचा जोर कमी झाला आहे. असे असले तरी हवेचा वेग ताशी 55 ते 65 किमी असा आहे.
Koyna Earthquake : कोयनेच्या विनाशकारी भूकंपाला ५५ वर्षे पूर्ण…पण तरीही
तो अजून कमी 30 ते 40 पर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. तमिळनाडूच्या उत्तर किनारपट्टी भागात असतानाच वादळाची गती मंदावली. आज म्हणजे शनिवारी सायंकाळी त्याचा जोर जवळपास पूर्ण ओसरेल, असेही सांगण्यात आले आहे.



