नारायणगाव, (वार्ताहर) – जुन्नर वनविभागाकडे 4 बिबट बेस कॅम्प,250 पिंजरे, 235 कॅमेरा ट्रॅप, 3 थर्मन ड्रोन, 4 रेस्क्यू व्हॅन उपलब्ध आहे. जुन्नर वनविभागात बिबट हल्ल्यात झालेले मृत्यू दुर्दैवी आहेत. वनविभागाने दिलेल्या सूचनांचे पालन केल्यास लोकजीवन सुरक्षित होण्यास मदत होईल, असे जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी म्हटले आहे. जुन्नर वनविभागांतर्गत पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड व शिरूर चार तालुक्यांचा समावेश होतो. वनविभागाची 611.22 चौ.कि.मी वनजमीन असली तरी व्यवस्थापनाच्या दृष्टीने जुन्नर, ओतूर, मंचर, घोडेगाव, खेड, चाकण, शिरूर सात वनपरिक्षेत्रामध्ये विभागली गेली आहे. जुन्नर वनविभागांतर्गत मागील 10 वर्षांत बिबट्याच्या झालेल्या हल्ल्याचा विचार केला असता, शेत पिकांच्या कामाकरिता गेलेल्या शेतकरी, मजूर, शेत परिसरातील एकट्या घराभोवतालच्या परिसरातील कुंपण नसलेल्या ठिकाणी झाले आहेत. मागील काही महिन्यांत बिबट्यांच्या संख्येत वाढ झाली असल्याने शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यासाठी वनविभागाने काही उपाययोजना अंमलात आणल्या आहेत. जुन्नर वन विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना जुन्नर वनविभागाने बिबट आपत्ती क्षेत्र करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे जुन्नर वन विभागांतर्गत जुन्नर, शिरूर, आंबेगाव, खेड या चार तालुक्यात बिबट मानव संघर्षाकरिता 233 गावे 2024 मध्ये बिबट आपत्ती क्षेत्र म्हणून घोषित करण्यासाठी पुढाकार घेणारा जुन्नर वनविभाग देशातील पहिला वनविभाग ठरला आहे. या उपाययोजना माणिक डोह बिबट निवारा केंद्र विस्तारीकरणासाठी 12.50 हेक्टर नवीन जागा राज्य शासनाकडून मिळवण्यात यश आले आहे. त्यामुळे बिबट निवारा केंद्रात 44 वरून 125 बिबट निवारा केंद्राच्या कामाला राज्य शासनाची मान्यता मिळाली आहे. पुढील सहा महिन्यात काम पूर्ण होणार आहे वनक्षेत्रात वन्यजीवांच्या निर्धारित संख्येपेक्षा जास्त असणार्या बिबट्याच्या नसबंदीचा प्रस्ताव व जास्तीच्या 75 बिबट्यांचे दूरच्या अभयारण्यात स्थलांतर करण्याचा केंद्राकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे अति संवेदनशील भागात उद्भवणार्या बिबट्यांच्या समस्या सोडवण्यासाठी स्थानिक तरुणांच्या माध्यमातून बिबट कृती दलाचे चार बेस कॅम्प निर्माण करण्यात आले आहे बिबट मानवी वस्ती जवळ आल्याची माहिती देणारी आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रणाली विकसित करून त्याचा वापर करणारा जुन्नर वनविभाग राज्यातील पहिला वन विभाग ठरला आहे विद्या प्रतिष्ठान बारामती व सीमु सॉफ्ट टेक्नॉलॉजी पुणे यांच्या मदतीने शेतात काम करणार्या माणसांच्या मानेला सुरक्षेसाठी काटेरीपट्टा (नेक बेल्ट) विकसित करण्यात आला आहे शेतातील एकटी घरे व गोठ्यासाठी सौर ऊर्जा कुंपण बिबट संरक्षण दल अंतर्गत अतिरिक्त 30 अधिकार्यांची मागणी