सातारा-जावळीतील 22 ग्रामपंचायत कार्यालयांसाठी 4.40 कोटी

सातारा, (प्रतिनिधी) – सातारा-जावळी मतदारसंघातील 22 गावांमध्ये नवीन ग्रामपंचायत कार्यालय इमारतींसाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे चार कोटी 40 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री योजनेतून जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत हा निधी मंजूर करण्यात आला आहे.
सातारा तालुक्यातील वेणेखोल, बेंडवाडी, मोरेवाडी, निगुडमाळ, पिलाणी, मस्करवाडी, वावदरे, राकुसलेवाडी, आरगडवाडी, बोपोशी, चाळकेवाडी, साबळेवाडी आणि पेट्री-अनावळे या ग्रामपंचायतींच्या नवीन कार्यालय बांधकामासाठी प्रत्येकी 20 लाख रुपयांप्रमाणे एकूण दोन कोटी 60 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
जावळी तालुक्यातील कुंभारगणी, पानस, म्हाते बुद्रुक, केसकरवाडी, वरोशी, बामणोली कसबे, मोहाट, मरडमुरे आणि नांदगणे या ग्रामपंचायतींच्या नवीन कार्यालयांच्या बांधकामासाठी प्रत्येकी 20 लाख रुपयांप्रमाणे एकूण एक कोटी 80 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
निविदा प्रक्रिया व इतर शासकीय सोपस्कार तातडीने पूर्ण करून ही कामे तात्काळ सुरू करा. कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करा, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी अधिकार्यांना दिल्या आहेत.





