#INDvAUS 3rd T20 : भारताने टाॅस जिंकला, कर्णधार रोहितने घेतला ‘हा’ निर्णय

हैदराबाद :- दुसऱ्या टी-20 सामन्यात विजय मिळवित भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. आता टी-20 मालिकेतील आज होणाऱ्या तिसरा आणि निर्णायक सामन्यात रोहित सेना मालिका विजयासाठी मैदानात उतरणार आहे. टी-20 विश्वचषकापूर्वी भारताला प्रमुख गोलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
भारत विरूध्द ऑस्ट्रेलिया या निर्णायक सामन्यास काहीच वेळात सुरूवात होणार असून तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा (टाॅस) कौल भारतीय संघाच्या बाजूनं लागला आहे. (India won the toss and elected to field) कर्णधार रोहित शर्मानेे नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत ऑस्ट्रेलिया संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं आहे.
🚨 Toss Update 🚨#TeamIndia have elected to bowl against Australia in the third #INDvAUS T20I.
Follow the match ▶️ https://t.co/xVrzo737YV pic.twitter.com/QkinggmHiU
— BCCI (@BCCI) September 25, 2022
दरम्यान, 2013 पासून भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला घरच्या टी-20 मालिकेत पराभूत करू शकला नव्हता. 2007 आणि 2013 मध्ये त्यांनी प्रत्येकी एक सामन्याची मालिका जिंकली. यावेळी संघाने मालिका जिंकल्यास नऊ वर्षांत प्रथमच कांगारूंना घरच्या मैदानावर पराभूत करणे शक्य होईल. 2017-18 मध्ये ही मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली आणि 2018-19 मध्ये ऑस्ट्रेलियाने 2-0 ने जिंकली.





