शिवाजीनगर न्यायालयात 353 जणांना करोना प्रतिबंधक लस
Updated On:

पुणे (प्रतिनिधी) – पुणे बार असोसिएशन व पुणे महापालिकाच्या वतीने शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयात वकिलांसाठी करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीमेचे आयोजन करण्यात आले होते.
या लसीकरण केंद्राचे उदघाटन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाले. वकील, न्यायाधीश आणि न्यायालयीन कर्मचारी मिळून 353 व्यक्तींना यामध्ये लसीकरण करण्यात आले.
त्यावेळी पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सतिश मुळीक, उपाध्यक्ष ॲड. सचिन हिंगणेकर, ॲड. योगेश तुपे, सचिव ॲड. विकास बाबर, कार्यकारिणी सदस्य ॲड. ओंकार चव्हाण ॲड. महेश भांडे उपस्थित होते.
शिवाजीनगर न्यायालयात लसीकरण करण्यासाठी दि पुना लॉयर्स कन्झ्युमर्स को-ऑपरेटीव्ह सोसायटीच्या अध्यक्ष ॲड.राणी कांबळे आणि स्वरदा बापट यांचे सहकार्य लाभले.





