जम्मू काश्मीरमधील ३४३ पर्यटक पुण्यात
Updated On:

पुणे – जम्मू काश्मीर येथे अडकलेल्या ६५७ पर्यटकांनी जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षास संपर्क साधला आहे. त्यामधील 343 पर्यटक हे दोन दिवसांत पुण्यात पोहचले आहे. उर्वरित सर्व पर्यटक दि. 29 एप्रिलपर्यंत पुण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
जम्मू -काश्मीर येथे असलेले पर्यटक विमान, रेल्वे किंवा खासगी वाहतुकीने पुण्यात येण्यास निघाले आहे. दि. 26 एप्रिल रोजी विमानाने 11 पर्यटक, रेल्वेने 39 पर्यटक तर खासगी वाहनाने 40 असे एकूण 90 पर्यटक येत आहे. उर्वरित सर्व पर्यटक दि. 29 एप्रिलपर्यंत पुण्यात पोहचत आहे. जिल्हा प्रशासन सर्व पर्यटकांच्या संपर्कात असून, नियंत्रण कक्षामार्फत माहिती घेण्यात येत आहे.





