Indonesia : इंडोनेशियामध्ये ऑनलाइन जुगार प्रकरणी ३२१ जणांना अटक
इंडोनेशियामध्ये ऑनलाइन जुगाराविरुद्ध पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईमध्ये ३०० पेक्षा जास्त जणांना अटक करण्यात आली आहे.

Indonesia – इंडोनेशियामध्ये ऑनलाइन जुगाराविरुद्ध पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईमध्ये ३०० पेक्षा जास्त जणांना अटक करण्यात आली आहे. राजधानी जकार्तामध्ये घातलेल्या एका छाप्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
अटक करण्यात आलेले बहुतेक जण विदेशी नागरिक आहेत, असे पोलिसांनी सांगितले. इंडोनेशियामध्ये बेकायदेशीर डिजीटल बेटिंग नेटवर्कवर करण्यात आलेली आतापर्यंतच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई होती, असेही पोलिसांनी म्हटले आहे.
जकार्ता शहराच्या चायना टाऊन भागाजवळील एका व्यावसायिक इमारतीमधून, प्रामुख्याने व्हिएतनाममधील ३२१ परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. चायना टाऊन या भागातून ७० ऑनलाइन गॅम्बलिकंग वेबसाइट चालवल्या जात असतात.
या वेबसाइटच्या माध्यमातून इंडोनेशियाच्या बाहेरच्या खेळाडूंना लक्ष्य केले जात असायचे. या ठिकाणी छापा घालून हे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यात आले. डिजीटल पुरावे आणि मार्केटिंगच्या नोंदी देखील जप्त करण्यात आल्या, असे पोलिसांनी सांगितले.
अटक केलेल्यांमध्ये २२८ व्हिएतनामी, ५७ चिनी नागरिक असून, उर्वरित लाओस, म्यानमार, थायलंड, मलेशिया आणि कंबोडिया येथील आहेत, असे इंडोनेशिया राष्ट्रीय पोलिसांमधील सामान्य गुन्हे विभागाचे संचालक वीरा सत्य त्रिपुत्रा यांनी सांगितले. या नेटवर्कचे संघटक आणि आर्थिक पुरवठा करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी तपास अजून सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.
ऑनलाईन गॅम्बलिंग उद्योगातले अनेक जण सापडले जाऊ नये म्हणून वारंवार आपली ठिकाणे बदलत असतात आणि वेबसाइट चालवण्यासाठी आणि ग्राहकांशी संपर्क साधण्यासाठी विदेशी नागरिकांना नियुक्त केले जाते. असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.





