कोयना धरणातून नदीपात्रात होणार 32 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

कोयनानगर ( वार्ताहर) : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायमच असल्यामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. धरणात सध्या १०२.६५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी २ टीएमसी पाणीसाठ्याची गरज आहे. पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस असल्यामुळे धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे.
धरणात मोठ्या प्रमाणात होणारी पाण्याची आवक लक्षात घेऊन उद्या गुरुवारी पहाटे ६ वाजता धरणाच्या दरवाजात वाढ करून धरणातून ३२००० कुसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार असल्याचे कोयना प्रशासनाने जाहीर केले आहे.धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी उद्या दि. २९ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वा. सांडव्यावरील विसर्ग वाढवून ३०,००० क्युसेक करण्यात येणार आहे.
येव्यानुसार त्यामध्ये वाढ करण्यात येईल.धरण पायथा विद्युत गृहामधील २,१०० क्युसेक विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग ३२,१०० क्युसेक असेल. कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.



