Koyna Dam: कोयना धरणातून शुक्रवारी सकाळी सात वाजता ३०,००० क्युसेक पाणी सोडणार
Updated On:

सातारा (प्रतिनिधी) – कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील मुसळधार पावसामुळे सातत्याने पाण्याची आवक वाढत आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी उद्या (दि. २६) सकाळी ७ वाजता सांडव्यावरून सोडण्यात आलेल्या विसर्गात वाढ करून ३०,००० क्युसेक विसर्ग सोडण्यात येणार आहे. तसेच आवक होईल त्यानुसार त्यामध्ये वाढ करणेत येईल.
धरण पायथा विद्युत गृहामधील १०५० क्युसेक्स विसर्गासह उद्या कोयना नदीमधील एकूण विसर्ग ३१०५० क्युसेक्स असेल. कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.
कोयना धरणामध्ये आज दि. २५ जुलै रोजी संध्याकाळी ८ वाजता धरणामध्ये एकूण ७९.४० टीएमसी म्हणजे ७५.४३ टक्के पाणीसाठा झाला आहे. सद्यस्थितीत सांडव्यावरून २०००० क्यूसेक्स विसर्ग सुरू आहे.





