300 तबलीगी नागरिक करणार रक्तदान

नवी दिल्ली : कोरोना विषाणुतून बरे झालेले काही तबलीगी नागरिक रक्तदान करणार आहेत. त्याच्या रक्तातून प्लाज्मा काढून कोरोनाबाधित रुग्णानावर उपचार करण्यात येणार आहेत. तबलिगी जमातीचे प्रमुख मौलाना मोहम्मद साद यांनी कोरोना संक्रमणातून मुक्त झालेल्या तबलिगी नागरिकांना रक्तदान करण्याची विनंती केली होती. मौलाना साद यांनी केलेल्या आवाहनानंतर दिल्लीतील 300 हून अधिक तबलीगी जमात कार्यकर्त्यांनी संक्रमित लोकांना रक्त देण्यास सहमती दर्शविली आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोरोनाबाधित रुग्णांवर घेतलेल्या प्लाझ्मा थेरपी चाचणीचे प्राथमिक निकाल खूप चांगले असल्याचे म्हटले होते. त्यानंतर त्यांनी कोरोनमुक्त झालेल्या नागरिकांनी रक्तदान करावे असं आवाहन केलं होत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आवाहनांनंतर सुल्तानपुरी सेंटरमधील ४ कोरोनमुक्त झालेल्या तबलिगी नागरिकांनी रक्तदान केले होते. यानंतर दिल्ली सरकारच्या संमती पत्रावर ३०० तबलिगी नागरिकांनी रक्तदान करण्यासाठी नोंदणी केली आहे.
दरम्यान, निजामुद्दीन येथील तबलिगी जमातचे प्रमुख असलेल्या मौलाना साद यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. मौलाना साद अद्यापही फरार असून दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रांचकडून त्यांचा सतत शोध सुरु आहे. परंतु, अद्याप क्राइम ब्रांचला यश आले नाही.





