Sangli News : मिरज तालुक्यातील गुंडेवाडीत तरुणाचा निर्घृण खून; पोटात चाकूचे वार करून संपवले आयुष्य
Sangli News : गुंडेवाडी येथे एका ३० वर्षीय तरुणाची पोटात चाकूचे सपासप वार करून अतिशय निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी सायंकाळी घडली आहे.

Sangli News : मिरज तालुक्यातील गुंडेवाडी येथे एका ३० वर्षीय तरुणाची चाकूने भोकसून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी सायंकाळी घडली. सुनील तानाजी खांडेकर (वय ३०, रा. गुंडेवाडी, ता. मिरज) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे गुंडेवाडी परिसरात खळबळ उडाली असून, हल्लेखोर कोण आणि खुनामागचे नेमके कारण काय, याचा शोध पोलीस घेत आहेत. (Sangli News)
मिळालेल्या माहितीनुसार, सुनील खांडेकर हे सोमवारी सायंकाळी आपल्या शेतात गेले होते. यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. हल्लेखोरांनी त्यांच्या पोटात चाकूचे वर्मी घाव घातल्याने ते गंभीर जखमी झाले. (Sangli News)
घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि मित्रपरिवाराने त्यांना तातडीने उपचारासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. (Sangli News)
घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुनामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, आरोपींचा शोध घेण्यासाठी आणि घटनेचा उलगडा करण्यासाठी मिरज ग्रामीण पोलीस पुढील तपास करीत आहेत. (Sangli News)
Sangli News : देशभरातील एटीएम चोरीच्या रॅकेटचा सांगली पोलिसांकडून पर्दाफाश





