Nagar | ‘लाडकी बहिणीसाठी जिल्ह्यात ३ लाख ८२ हजार अर्ज नोंदणी

नगर, (प्रतिनिधी) – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजणेसठी नगरसह राज्यात युध्द पातळीवर काम सुरु आहे. नगर जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख ८२ हजार ९८७ महिलांची नोंदणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात सुमारे ८ हजार ८८१ मतद केंद्र कार्यरत आहे. १ लाख ४६ हजार ८७५ महिलांचे आॅनलाईन तर २ लाख ३६ हजार १०३ महिलांचे आॅफलाईन अर्ज दाखल करण्यात आले असल्याची माहिती नोडल अधिकारी मनोज ससे यांनी दिली आहे.
दरम्य़ान दोन दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजणेचा आढावा घेतला. या योजनेचे अर्ज भरताना कोणीही महिलांची आर्थिक पिळवणूक केल्यास त्यांच्यावर थेट कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सालीमठ यांनी दिले आहे. तसेच शासकीय कर्मचारी असल्यास त्यांच्यावर निलंबनासह अन्य कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकारी यांना देल्या आहेत.
या बैठकीत राज्याचे मुख्य सचिव यांच्यासह महसूल, महिला बालकल्याण विभागाच्या अधिकार्यांसह जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, मुख्यकार्यकारी अधिकारी आषिश येरेकर, समाज कल्याण उपायुक्त राधाकिसन देवढे, योजनेचे नोडल अधिकारी मनोज ससे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.





