बीएसएफच्या ३ जवानांचा अपघातात मृत्यू; तर ९ जवान जखमी
Updated On:

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली. त्या अपघातात ३ जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर, ९ जवान जखमी झाले. जम्मू-काश्मीरमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे.
ती निवडणूक सुरळितपणे पार पडावी यासाठी सुरक्षेची जबाबदारी बीएसएफवरही सोपवण्यात आली आहे. निवडणूक ड्युटीवर असणाऱ्या बीएसएफ जवानांच्या प्रवासासाठी भाडेपट्ट्यावर एका बसची व्यवस्था करण्यात आली.
ती बस मध्य काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात रस्त्यालगत असणाऱ्या दरीत कोसळली. त्या अपघातात १२ जवान जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात हलवण्यात आले. मात्र, जखमींपैकी तिघांची प्राणज्योत मालवली.





