2nd Hockey India Jr West Zone Championship 2024 : महाराष्ट्राचा गुजरातवर एकतर्फी विजय…

2nd Hockey India Junior Men & Women West Zone Championship – हॉकी महाराष्ट्राने हॉकी गुजरातवर 14-0 असा मोठ्या फरकाने विजय मिळवत दुसऱ्या हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष पश्चिम विभागीय स्पर्धेत अंतिम फेरीच्या दृष्टीने कूच केली. महाराष्ट्रकडून कार्तिक पठारे (6 गोल) आणि विशाल मंदाडे (5 गोल) यांनी सर्वोत्तम कामगिरी करताना गुजरातचा सहज पराभव केला.
त्यांना अर्जुन हरगुडे (2) आणि संतोष बिराजदारला (1) चांगली साथ लाभली. महाराष्ट्राचा 4 सामन्यातील हा तिसरा विजय आहे. त्यांच्या खात्यात 9 गुण असून अ गटामध्ये ते दुसऱ्या क्रमांकावर आहे. 13 गुणांसह मध्य प्रदेश अव्वल स्थानी आहे. हॉकी महाराष्ट्र त्यांचा शेवटचा साखळी सामना हॉकी राजस्थानविरुद्ध खेळेल.
Women’s Asia Cup 2024 (Semi Final 1) : बांगलादेशविरुद्ध चांगली कामगिरी अपेक्षित – शेफाली वर्मा
निकालः कनिष्ठ पुरुष – अ गट: महाराष्ट्र: 14 (कार्तिक पठारे 4′, 5′, 17′, 32′, 47′, 49′; विशाल मंदाडे 6′ – पीसी, 20′, 35′, 38′, 49′ – पीसी; संतोष बिराजदार 10′, अर्जुन हरगुडे 50′, 55′) विजयी वि. हॉकी गुजरात: 0. हाफटाईम: 6-0.





